---Advertisement---

आयपीएल २०१९ च्या सुरुवातीलाच धोनी-कोहली येणार आमने-सामने

On: मंगळवार, फेब्रुवारी 19, 2019 3:44 PM
---Advertisement---

आयपीएल 2019 चा मोसम भारतातच होणार असून 23 मार्चपासून या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक आज(19 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. हा निर्णय अगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.

पहिल्या दोन आठवड्यांच्या तारखा निवडणूकीच्या मधे येणार नाहीत. तर आयपीएलचे तिसऱ्या आठवड्यापासूनचे वेळापत्रक निवडणूकांचे वेळापत्रक आल्यानंतर घोषित केले जाणार आहे. त्यामुळे सध्या फक्त 23 मार्च ते 5 एप्रिल दरम्यानचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

या दोन आठवड्यात एकूण 17 सामने 8 संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. या मोसमातील सलामीचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व्यतिरिक्त सर्व संघ या दोन आठवड्यात एकूण चार सामने खेळणार आहेत. तर दिल्ली आणि बेंगलोर एकूण 5 सामने खेळणार आहे. यातील दिल्ली 3 सामने घरच्या मैदानावर तर बेंगलोर 3 सामने बाहेरच्या मैदानावर खेळतील. तसेच अन्य संघ प्रत्येकी 2 सामने घरच्या आणि 2 सामने बाहेरच्या मैदानावर खेळणार आहेत.

असे आहे आयपीएल 2019 च्या मोसमातील पहिल्या दोन आठवड्याचे वेळापत्रक-

23  मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – चेन्नई

24 मार्च – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – कोलकता

24 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मुंबई

25 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – जयपूर

26 मार्च- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – दिल्ली

27 मार्च – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – कोलकता

28 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – बंगळूरु

29 मार्च – सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – हैद्राबाद

30 मार्च – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स – मोहाली

30 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स – दिल्ली

31 मार्च – सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – हैद्राबाद

31 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – चेन्नई

1 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मोहाली

2 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – जयपूर

3 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज –  मुंबई

4 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायधर्स हैद्राबाद – दिल्ली

5 एप्रिल – रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स – बंगळूरु

महत्त्वाच्या बातम्या- 

या कारणामुळे केएल राहुलची ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील जागा झाली पक्की

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटला बसला हा मोठा धक्का

विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानबरोबर खेळायला नको

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment