इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर या लिलावात मोठी रक्कम मिळाली. जम्मू व काश्मीर संघाचा युवा अष्टपैलू विवरांत शर्मा हा देखील सर्वांना चकित करत करोडपती बनला. तब्बल 2 कोटी 60 लाख रुपये खर्च करून सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना आपल्या यशाचे श्रेय भारताच्या एका माजी क्रिकेटपटूला दिले.
आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत केवळ 2 प्रथमश्रेणी, 14 लिस्ट ए व 9 टी20 सामने खेळलेल्या विवरांतला सनरायझर्स हैदराबाद मे केकेआरशी लढून आपल्याकडे ओढले. विवरांत डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज तसेच उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. तो लेग स्पिन तसेच ऑफ स्पिन अशा दोन्ही प्रकारची गोलंदाजी करू शकतो. त्याच्या याच खुबीमुळे त्याच्यावर मोठी बोली लागली गेली. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करतो. या आपल्या यशानंतर बोलताना त्याने नुकतीच पहिली प्रतिक्रिया दिली.
विवरांत म्हणाला,
“2018 मध्ये इरफान पठाण हे जम्मू-काश्मीर संघाचे मार्गदर्शक होते. त्यावेळी ते त्यांना आवडणाऱ्या काही खेळाडूंना नेहमी मार्गदर्शन करताना दिसत. त्याचवेळी त्यांनी मला तुझ्यात मोठी गुणवत्ता आहे, तू मेहनत घे एक दिवस नक्कीच मोठा क्रिकेटपटू बनशील, असे म्हटलेले. त्यांचे हे शब्द माझ्या नेहमी लक्षात राहिले. मी त्यानुसारच पुढे मेहनत घेतली आणि इथपर्यंत पोहोचलो. इतक्या मोठ्या खेळाडूंनी केलेले कौतुक नेहमीच लक्षात राहणारे असते.”
अब्दुल समद व उमरान मलिक यांच्यानंतर सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणारा विवरांत तिसरा जम्मू काश्मीरचा खेळाडू बनला.
(Vivrant Sharma thankful to Irfan Pathan for his success in ipl 2023 auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
VIDEO: सामना जिंकताच अश्विनचा एकच जल्लोष! ड्रेसिंग रूममधील विराट, राहुलची रिऍक्शन व्हायरल