नुकत्याच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेदरम्यान भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाच्या नियमांचे उल्लंघन केले होते. तिने केलेल्या नियामांच्या उल्लंघनानंतर कुस्ती महासंघाने तिला याची कारणे विचारली होती. असे असले तरी आता विनेश फोगटला भारतीय कुस्ती महासंघाने माफ केले आहे. कुस्ती महासंघाने विनेश फोगटच्या विरोधातील अनुशासनात्मक कारवाईला स्थगित केली आहे. ती आता पुन्हा भारतासाठी कुस्ती खेळायला सुरूवात करू शकते. त्यामुळे तिच्याकडे जागतीक अजिंक्यापदासाठी स्थान निर्माण करण्याची संधी आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यापूर्व फेरीत विनेशला मिळालेल्या पराजयानंतर तिच्या अडचणी वाढतच गेल्या. भारतीय कुस्ती महासंघाने तिला नियमांचे उल्लंघन केल्यामुळे निलंबित केले होते आणि तिला याची नोटिसही पाठवली होती. विनेशने या नोटिसचे उत्तर देत तिने केलेल्या चुकीसाठी महासंघाची माफीही मागितली होती.
विनेशने नोटिसला दिलेल्या उत्तरावर भारतीय कुस्ती महासंघ समाधानी नाहीये, तरीही महासंघाने तिला माफी दिलेली आहे. महासंघाचं म्हणणे आहे की विनेश फोगट आणि अन्य दोन कुस्तीपटू यांची उत्तरे समाधानकारत नाहीत. मात्र महासंघ या खेळाडूंना दुसरी संधी देत आहे आहे. महासंघाने स्पष्ट केले आहे की, जर विनेश फोगट भविष्यात कोणती दुसरी चूक केली. तर तिच्यावर आजीवन बंदी घालण्यात येईल.
विनेश फोगटवर ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंसोबत सराव न केल्याचा आरोप आहे. त्याव्यतिरिक्त उपांत्यापूर्व फेरीत तिने भारतीय कुस्ती महासंघाच्या पोशाख घातला नव्हता. तिने पोशाखाच्याबाबत तिची चुक झाल्याचे मान्य केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने विनेशव्यतिरिक्त आणखी दोन खेळाडू दिव्या आणि सोनम यांनाही माफ केले आहे. कुस्ती महासंघेचे म्हणणे आहे की, दिव्या आणि सोनम या दोघीही युवा खेळाडू आहेत आणि त्यांना दुसरी संधी दिली गेली पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या-
विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाची मागितली माफी, ‘या’ कारणास्तव केले होते निलंबित
विनेश फोगटवर झाली निलंबनाची कारवाई, ऑलिम्पिक स्पर्धेतील वर्तन आले अंगाशी