इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी सर्वबाद होताना ३६४ धावांची मोठी मजल मारली. भारतीय डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला ४२ धावांवर बाद केले. भारताचे माजी क्रिकेटपटू व समीक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतीय कर्णधाराच्या फलंदाजीचे विश्लेषण करून त्याच्या होणाऱ्या चुका निदर्शनास आणून दिल्या.
याठिकाणी चुकतो विराट
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी विराट कोणत्या ठिकाणी चुकत आहे, याबाबत बोलताना म्हटले, “कोहली ऑफ-स्टंपमध्ये आणि त्याच्या आसपास खूप हालचाल करत आहे. २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापासून विराट अजिबात बदलला नाही. त्या दौऱ्यावेळी विराटने इंग्लंडमधील वेगवान खेळपट्ट्या आणि स्विंग होणाऱ्या वातावरणात चांगला खेळ केला होता.”
भारतीय कर्णधाराने या वेळी लॉर्ड्सच्या चांगल्या खेळपट्टीवर ४२ धावा बनविल्या. मात्र, तो तितकासा प्रभावी वाटत नव्हता.
विराटच्या फलंदाजी तंत्राबद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाले, “इंग्लंडच्या गोलंदाजांनी अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध अशी अचूक गोलंदाजी केली. त्यांना माहित आहे की, कोहलीवर दबाव टाकण्याचे क्षेत्र ऑफ-स्टंपच्या आसपास आहे. त्या भागातील चेंडू खेळताना तो सहज दिसतो, हे अगदी स्पष्ट आहे. तो मार्क वूडच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करताना काहीसा भयभीत दिसत होता.”
विराटला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसनने पहिल्या चेंडूवर बाद केले होते.
विराटला ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतिक्षा
विराट नोव्हेंबर २०१९ पासून आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही. बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे त्याने हे शतक झळकावले होते. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवायचा असेल तर, विराटला २०१८ दौऱ्यावेळीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. त्या दौऱ्यावर विराटने पाच सामन्यांत ५९३ धावा फटकावल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मेस्सीने बाल्कनीत भारतीय चाहत्याचे स्वीकारले अभिवादन ; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘अरे भाऊ, मस्त!’, हार्दिकच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो
फाफ डू प्लेसिस ‘द हंड्रेड’मधून पडला बाहेर, नॉदर्न सुपरचार्जर्ससाठी लिहिली भावनिक पोस्ट