वेस्टइंडीज येथे सध्या एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक (U19 Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने साखळी फेरीतील आपले तिन्ही सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. प्रमुख खेळाडू कोरोनाबाधित झाल्यानंतरही भारतीय संघाने ही कामगिरी करून दाखवली. भारतीय संघाचा गटातील अखेरचा सामना शनिवारी (२२ जानेवारी) युगांडाविरुद्ध खेळला गेला. भारतीय संघाने या सामना दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर भारतीय संघाचे मार्गदर्शक व दिग्गज भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
लक्ष्मण यांची मने जिंकणारी कृती
युगांडाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला. युगांडा प्रथमच इतक्या मोठ्या पातळीवर क्रिकेट खेळत आहे. भारतीय संघाने या सामन्यात अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले असले तरी, युगांडाच्या खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने सर्वांची वाहवा मिळवली. सध्या भारताच्या युवा संघाचे मार्गदर्शक असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील या संघाच्या कामगिरीने प्रभावित झाले.
सामना संपल्यानंतर लक्ष्मण यांनी थेट युगांडा संघाचे ड्रेसिंग रूम गाठले. त्यांनी तेथे बराच वेळ युगांडाच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी आपले अनुभव त्या खेळाडूंना सांगितले. लक्ष्मण यांच्या या अचानक भेटीने युगांडाचे खेळाडू कमालीचे उत्साहीत झाले होते. लक्ष्मण हे युगांडा संघाला मार्गदर्शन करत असतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Indian Legend @VVSLaxman281 visited our camp yesterday after the game and gave some advise to the boys after our game aganist India U-19. Thank you Laxman Bhai.#Cheer4BabyCricketCranes pic.twitter.com/o35UV3x5TD
— Uganda Cricket Association (@CricketUganda) January 23, 2022
भारतीय संघाचा दणदणीत विजय
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अंगकृष रघुवंशी व राज बावा यांच्या शतकांच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ४०५ धावा बनविल्या होत्या. प्रत्युत्तरात, युगांडा संघ भारतीय संघाचा मुकाबला करू शकला नाही व केवळ ७९ धावांवर बाद झाला. कर्णधार निशांत संधू याने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे. भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी ‘विलन’ ठरतोय रिषभ! यष्टिरक्षणातील चुकांची मोजावी लागतेय संघाला किंमत (mahasports.in)
एक शतकी खेळी आणि विक्रमांची रांग! डी कॉकने सोडले रथी-महारथींना मागे (mahasports.in)
विनयच्या ‘गोल्डन’ बोनसने हरियाणाचा युपीवर एका गुणाने विजय (mahasports.in)