---Advertisement---

पहिलंच कसोटी शतक मारल्यावर धोनी घेणार होता निवृत्ती, पहा काय होतं नक्की प्रकरण

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 12:04 PM
---Advertisement---

जरी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याचा भारतीय क्रिकेटवरील दबदबा नेहमी राहणार आहे. धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही मिळवलं आहे. २००७ साली त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली भारताला पहिला टी२० विश्वचषक जिंकून दिला. पुढे २०११ला भारताला वनडे विश्वचषक आणि २०१३ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. यासह ३ आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार बनला.

शानदार कर्णधारासह धोनी क्रिकेटमधील उत्कृष्ट फिनिशर देखील आहे. त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीला मोठमोठे शॉट्स मारत मोठ्या खेळी करण्याची त्याची क्षमता दाखवून दिली होती. धोनीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिली मोठी खेळी २००६ला पाकिस्तानविरुद्धच्या फैसलाबाद कसोटी सामन्यात केली होती.

या सामन्यात धोनीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शकत ठोकले होते. १५३ चेंडूत १४८ धावा करत त्याने हा कारनामा केला होता. यात त्याच्या १९ चौकारांचा आणि ४ षटकारांचा समावेश होता. धोनी १४८ धावांवर दानिश कनेरियाच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. तेव्हा धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला पाहिजे, असे म्हटले होते. VVS Laxman Recalls That MS Dhoni Wants To Retire After His First Test Century

त्या सामन्यात धोनीचा संघसहकारी असणाऱ्या व्हिव्हिएस लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ शोमध्ये बोलताना सांगितले की, “मला अजूनही आठवत आहे. धोनी शतक केल्यानंतर बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये आला आणि म्हणाला की, मी माझ्या निवृत्तीची घोषणा करतो. मी कसोटी क्रिकेटमध्ये शतक मारले आहे. बस यार. मला आता अजून काहीच नकोय.”

धोनीच्या तोंडून हे सर्व ऐकून लक्ष्मणला झटका बसला होता. पण धोनीने मजेत त्याच्या निवृत्तीची गोष्ट म्हटली होती. धोनी त्या सामन्यात शतकी करुनही भारताला तो सामना जिंकवून देऊ शकला नव्हता. पण, त्याच्या शतकी खेळीमुळे तो सामना अनिर्णीत राहिला होता.

१५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२०मध्ये खेळताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

चेतन चौहान यांच्या निधनानंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरचे निधन, क्रीडाजगत शोकसागरात बुडाले

पाकिस्तानला नमविण्यासाठी इंग्लंड घेणार पाकिस्तानी अष्टपैलूची मदत; कोचिंग स्टाफमध्ये केले सामील

नवव्या क्रमांकावर द्विशतक ठोकणारा खेळाडू झाला ‘ऑस्ट्रेलिया’चा मुख्य प्रशिक्षक

ट्रेंडिंग लेख –

सुरेश रैनाचे ५ मोठे विक्रम जे नेहमीच लक्षात राहतील…

सीपीएल २०२०: जमैका तल्लावझ विरुद्ध सेंट ल्युसिया झुक्स सामन्यांत ‘या’ ३ खेळाडुंवर असेल नजर

आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---