भारतीय क्रिकेट वर्तुळातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू सध्या अनेक धार्मिक ठिकाणी दिसून येतात. वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यापासून अनेक युवा क्रिकेटपटू देखील देवस्थानांना आपल्या कुटुंबासह भेट देताना दिसले. त्याचवेळी आता भारताचे माजी क्रिकेटपटू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देखील नुकतीच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. त्यांच्या या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
लक्ष्मण हे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संचालक म्हणून काम पाहतात. सध्या सर्व भारतीय खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त असल्याने त्यांचा कार्यभार काहीसा कमी झाला आहे. या वेळा त्यांनी महाकालेश्वर मंदिर ला भेट देण्याचा निर्णय घेतल. त्यांनी आपली पत्नी शैलजा व मुलांसह देवदर्शन घेतले. मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीत त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर महाकालेश्वराला पंचामृत अभिषेक त्यांच्याद्वारे करण्यात आला. तसेच, नंदी दर्शन देखील त्यांनी घेतले.
Had divine darshan at Mahakaleshwar and Omkareshwar.
May Lord Shiva shower his benign blessings on you and your loved ones.
JAI MAHAKAAL 🙏🏼 pic.twitter.com/aT2CR8YBdf— VVS Laxman (@VVSLaxman281) April 1, 2023
मंदिरातील दर्शनाची छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर करताना त्यांनी लिहिले,
‘महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरचे आज दर्शन घेतले. भगवान शिव त्यांचे आशीर्वाद सर्वांना देवो.’
यापूर्वी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने आपल्या पत्नीसह भेट दिली होती. तसेच भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज केएल राहुल व त्याची पत्नी आथिया शेट्टी तसेच उमेश यादव याने सपत्नीक या ठिकाणी पूजा केलेली. जानेवारी महिन्यात झालेल्या भारत आणि श्रीलंका वनडे सामन्यावेळी भारतीय संघातील सदस्य असलेल्या सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर व युजवेंद्र चहल यांनी देखील महाकालेश्वरचे दर्शन घेतलेले.
(VVS Laxman Take Darshan Of Mahakaleshwar Temple With Family)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात झाली धोनीला दुखापत? प्रशिक्षक म्हणतायेत, “वयाच्या या टप्प्यावर…”
“तो संघात असल्यावर काळजी नसते”, कर्णधार हार्दिककडून राशिदचे तोंडभरून कौतुक