भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी२० मालिका ७ जुलैपासून सुरू होत आहे. टी२० मालिकेसाठी दोन वेगवेगळ्या संघांची निवड केल्यानंतर भारताने आणखी एक मोठा बदल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे.
एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या कसोटीदरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड टीम इंडियाचा भाग आहेत. एजबॅस्टन कसोटी ५ जुलैपर्यंत चालणार असून कसोटी संघाशी संबंधित खेळाडू आणि कर्मचारी पहिल्या टी२० सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे.
यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावरही मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा कोविड-१९ अहवाल निगेटिव्ह आला आहे, ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. रोहित शर्मानेही टी२० मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे.
हे खेळाडू पहिल्या टी२० सहभागी होणार नाहीत
एजबॅस्टन ते साउथहॅम्प्टनच्या अंतरामुळे कसोटी संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना टी२० मालिकेपूर्वी विश्रांतीची संधी मिळणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे पहिल्या टी२०साठी संघाचा भाग नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं.
पहिल्या टी साठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
दरम्यान, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाची कामगिरी चांगली झाली आहे. लक्ष्मण यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेत २-० असा विजय नोंदवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अन्य संघांप्रमाणे पाकिस्तान याबाबतीत राहिला मागे; स्वत: कर्णधारानेच केलं मान्य
‘भारताने सामन्यात चमकदार कामगिरी केली’ माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केली संघाची पाठराखण