भारतीय संघ बऱ्याच काळापासून अष्टपैलू वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे, पण हा शोध संपण्याचे नाव घेत नाही आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्या असला तरी त्याचा फिटनेस सतत चिंतेचा विषय ठरला आहे. अशा परिस्थितीत, संघाला बहुतेक त्याच्याशिवाय सामन्यांमध्ये मैदानात उतरावे लागू शकते.
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा मध्य प्रदेशचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने त्याच्या स्फोटक फलंदाजीबरोबरच त्याच्या गोलंदाजीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलमध्ये अय्यरने फलंदाजीचा धडाका लावला आहे, पण याशिवाय त्याने पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध त्याच्या मध्यम वेगवान गोलंदाजीची झलकही दाखवली होती. त्याने त्या सामन्यात दोन गडी बाद केले होते.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यंकटेश अय्यर याची जोरदार स्तुती केली आहे. अय्यरच्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीनेही गावसकर प्रभावित झाले आहेत. ते म्हणाले की, भारतीय संघ ज्या अष्टपैलू खेळाडूला बऱ्याच काळापासून शोध घेत होता, तो व्यंकटेश अय्यरमुळे पूर्ण होईल.
आपल्या स्तंभात गावसकर यांनी व्यंकटेश अय्यरच्या अष्टपैलू प्रतिभेचे कौतुक करताना म्हटले की, ‘हा युवा खेळाडू उत्कृष्ट यॉर्कर टाकतो ज्यावर फलंदाज स्लॉग शॉट खेळूच शकत नाही.’
ते पुढे म्हणाले, व्यंकटेश अय्यरच्या रुपात कोलकाता संघाने एक असा खेळाडू शोधून काढला आहे, ज्याला भारतीय संघ बराच काळापासून शोध घेत होता. तो फार वेगवान गोलंदाजी करत नाही पण तो अचूक जागेवर यॉर्करवर गोलंदाजी करण्यास सक्षम आहे ज्यावर फलंदाज मुक्तपणे खेळू शकत नाही. एक फलंदाज म्हणून तो प्रभावीपणे खेळतो. तो शॉर्ट बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळतो.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीवर भाष्य करताना गावसकर यांनी अय्यरचे खूप कौतुकही केले आहे. अय्यरच्या ६७ धावांच्या खेळीबद्दल ते म्हणाले, की त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडूसाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. तो ज्या प्रकारे यॉर्कर गोलंदाजी करतो, ती त्याची खासियत आहे. त्यासाठी तो आपल्या उंचीचा योग्य वापर करतो. तो लवकरच भारतीय संघामध्ये स्थान मिळवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलचा नवा विक्रम! पंजाबसाठी ‘असा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज
जागा एक दावेदार चार! आता रंगणार प्ले ऑफसाठी खरा महासंग्राम; जाणून घ्या सर्व गणिते
टी२० विश्वचषकासाठीच्या श्रीलंका संघात बदल; ‘हे’ नवे पाच खेळाडूही करणार युएई वारी