भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने अनवधानाने केलेल्या चूकी व्यतिरिक्त बीसीसीआयसाठी 2017 हे वर्ष डोपिंगमुक्त राहिले आहे. असा अहवाल वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने (वाडा) बीसीसीआयच्या 275 नमुन्यांची चाचणी केल्यानंतर दिला आहे.
या चूकीसाठी बीसीसीआयने युसूफवर 5 महिन्यांची बंदी घातली होती. या बंदीचा कालावधी यावर्षीच्या आयपीएल आधी संपुष्टात आला. त्यावेळी बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते की ” साधारणत: कफ सिरपमधे आढळणारा प्रतिबंधक पदार्थ अनवधानाने त्याने घेतला होता.”
त्यामुळे त्याचे 15 आॅगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018 या पाच महिन्याच्या कालवधीत निलंबन झाले होते.
प्रतिकूल विश्लेषणात्मक शोध (एएएफ) नुसार पठाणचे एकमेव प्रकरण होते. तर अनियमित शोध (एटीएफ) नुसार दोन खेळाडूंचे यूरिन नमुनेही संशयास्पद आहेत. परंतू या दोन खेळाडूंमध्ये एखादा परदेशी खेळाडू आहे की नाही याबद्दल अजून काही माहिती मिळालेली नाही.
वाडाच्या अहवाला नुसार 2017 मध्ये 275 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील 233 नमुने हे स्पर्धा सुरु असताना तपासले केले गेले (आयसी टेस्टींग) तर 42 नमुने हे स्पर्धेव्यतिरिक्त तपासण्यात आले (ओओसी).
2016 च्या आयपीएल दरम्यान न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम डोपिंगंमध्ये पॉझिटिव्ह सापडला होता. पण त्यावेळी बीसीसीआयने उपचारात्मक वापराची सूट प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे ते प्रकरण तिथेच संपले होते.
2018 मध्येही अभिषेक गुप्ता हा फक्त एक खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये सापडला आहे. यामुळे पंजाबच्या या खेळाडूवर 8 महिन्याची बंदी घालण्यात आली आहे.
याबरोबरच जागतिक क्रिकेटही यावर्षी जवळजवळ डोपिंगमुक्त राहिले आहे. आयसीसीने यावर्षी 389 क्रिकेटपटूंची तपासणी करण्यात आली आहे. यात फक्त आफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद शहजाद तपासणीत पॉझिटिव्ह आढळला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर
–भारतीय क्रिकेट इतिहासात असे दुसऱ्यांदा घडले
–एमएस धोनीचा मैदानाबाहेरही मोठा विक्रम