श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) संघात आगामी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघातील मालिकेला उद्यापासून (13 नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वीच श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
श्रीलंका क्रिकेटने (SLC) मंगळवारी (12 नोव्हेंबर) ही माहिती दिली. हसरंगाच्या जागी श्रीलंकेने दुशान हेमंताचा (Dushan Hemantha) संघात समावेश केला आहे. हसरंगाने न्यूझीलंडविरूद्धच्या 2 टी20 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या होत्या, पण अलीकडेच त्याला दुखापतीशी झगडावे लागले आहे.
हसरंगाने दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी उद्ध्वस्त केली होती. न्यूझीलंडला केवळ 108 धावांत गुंडाळले, परंतु पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन करत 5 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. बुधवारपासून (13 नोव्हेंबर) डंबुला येथे 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून पुढील 2 सामने 17 आणि 19 नोव्हेंबरला पल्लेकेले येथे खेळले जाणार आहेत.
3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ-
श्रीलंका- चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल परेरा, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, सदीरा समराविक्रमा, निशान मदुष्का, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरांगा, महिश तीक्ष्णा, जेफ्री वांडेरसे, चामिडू विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो
न्यूझीलंड- मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जेकब डफी, ॲडम मिल्ने, झॅक फॉक्स, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (यष्टीरक्षक), हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टिम रॉबिन्सन, नॅथन स्मिथ, इश सोढी, विल यंग
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; ‘हे’ 3 खेळाडू केकेआरच्या कर्णधार पदासाठी ठरू शकतात दावेदार
बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे फलंदाज (टाॅप-5)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली-रोहित शर्मा यांची आकडेवरी कशी? पाहा सर्वकाही