श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार वानिंदू हसरंगाने श्रीलंका क्रिकेटला पत्र लिहून ही माहिती दिली आहे.
क्रिकेट श्रीलंकाला लिहिलेल्या पत्रात वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने कसोट क्रिकेटमधून निवृत्तीचे कारण स्पष्ट केले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला आपली कारकिर्द मोठी करायची असल्यामुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे त्याने स्वष्ट केले आहे. श्रीलंका क्रिकेटचे सीईओ एशले डीसिल्वा यांच्या हवाल्याने बोर्डाकडून सांगितले केले की, “आम्ही त्याचा निर्णय स्वीकार करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की, हसरंगा येत्या काळात संघासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक महत्वाचा भाग असेल.”
हसरंगाच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने अवघ्या 4 सामन्यांमध्ये श्रीलंकन संघाचे प्रतिनिधित्व केले. या चार कसोटी सामन्यांमध्ये त्याला 4 विकेट्स मिळाल्या, तर फलंदाजी करताना196 धावा करता आळ्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. हसरंगाने आपला पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्याला अपेक्षित संधी आणि यश मिळाले नाही, असेच पाहायला मिळते .
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या हसरंगाची मर्यादित षटकांमधील आकडेवारी मात्र अप्रतिम आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने खेळलेल्या 48 सामन्यांमध्ये 67 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 5.07 आहे, तर सरासरी 28.77 राहिली आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 23.77च्या सरासरीने 832 धावा केल्या आहेत. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 58 सामन्यांमध्ये 91 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजाच्या रुपात या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत533 धावाही केल्या आहेत. (Wanindu Hasaranga has informed Sri Lanka Cricket about Test retirement )
महत्वाच्या बातम्या –
15 ऑगस्टला भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागलाय असा निकाल, फक्त एकदा मिळालाय विजय
स्वातंत्र्य दिन विशेष| असे भारतीय क्रिकेटर, ज्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या नात्यातील मुलीशी बांधली होती लग्नगाठ