चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. खेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याने हा सामना पूर्ण पाच दिवस चालणार नाही, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलेला दिसून येतो. त्यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांनी इंग्लंड संघात किती धावसंख्येवर बाद होणार याबाबतची भविष्यवाणी केली आहे.
शेन वॉर्नने केली भविष्यवाणी
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई कसोटीचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वी वॉर्न यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले. हे ट्विट करताना त्याने दोन्ही संघांच्या पहिल्या डावातील धावसंख्येविषयी भविष्यवाणी केली होती. त्यांनी लिहिले, ‘दुसऱ्या दिवसासाठी माझा अंदाज आहे की भारतीय संघ पहिल्या डावात ३५९ धावा करेल आणि चहा पानापर्यंत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी येईल. कारण, इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १५७ धावांवर सर्वबाद होईल.’
या अंदाजानंतर भारतीय संघाचा पहिला डाव संपल्यानंतर त्यांनी पुन्हा ट्विट करत इंग्लंड संघाला आपल्या अंदाजाची आठवण करून दिली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘इंग्लंडसाठी आता काम सोपे झाले आहे. कारण माझ्या अंदाजापेक्षा ३० धावा भारतीय संघाने कमी बनविल्या आहेत. इंग्लंड संघ किती धावा बनवणार? माझा १५७ धावांचा अंदाज लक्षात असू द्या.’
My prediction for today’s play in the second test between England and India in Chennai !!! India all out 359 and batting again by no later than tea – after bowling England out for 157 !!! @nassercricket @isaguha @harbhajan_singh @MichaelVaughan @robkey612 @SkyCricket @FoxCricket
— Shane Warne (@ShaneWarne) February 14, 2021
The easy job is done for Eng. Now the fun begins. India lost it’s last 7 wickets for 81 runs. I was 30 runs over for India’s 1st innings (should have been closer to my 359 – if the tail hung in with Pant). How many runs Eng in their 1st innings ? Remember my guess was 157 !!!!!
— Shane Warne (@ShaneWarne) February 14, 2021
इंग्लंडच्या डावाला लागली गळती
सलामीवीर रोहित शर्माच्या १६१, उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या ६७ व यष्टीरक्षक रिषभ पंतच्या नाबाद ५८ धावांच्या जोरावर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३२९ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची अत्यंत खराब सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी दुसरे सत्र सुरू असताना इंग्लंडची स्थिती ६ बाद ९२ अशी झाली आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विनने तीन गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आले तसे गेले..! भारत-इंग्लंडचे सलामीवीर भोपळाही न फोडता माघारी, तब्बल ३४ वर्षांनंतर घडलं असं
कमालच! इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला दिली नाही एकही अवांतर धाव, मोडला तब्बल ६६ वर्षे जुना विक्रम