---Advertisement---

आयसीसीची वॉर्नर- डीकॉकवर दंडाची कारवाई

On: गुरूवार, मार्च 8, 2018 1:36 AM
---Advertisement---

नुकताच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमधील झालेला डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटॉन डीकॉक यांच्यातील वाद चांगलाच गाजला आहे. हा वाद ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज डीकॉक या दोघांनाही भारी पडला आहे.

आइसीसीने मैच रेफरी आणि मैदानावरील पंच यांच्या अहवालावरून आयसीसीची आचारसंहिता लेव्हल 2 नुसार वॉर्नरला दंड म्हणून त्याच्या सामना शुल्कामध्ये ७५% कपात आणि त्याला तीन डिमेरिट पॉइंट्स ही दिले आहेत.

जर त्याला आणखी एक डिमेरिट पॉइंट मिळाला असता तर त्याच्यावर सामना बंदीचे संकट देखील ओढवले असते. वॉर्नरने आइसीसीने केलेली कारवाई मान्य केली असून त्याविरोधात तो कोणतेही अपील करणार नाही.

याबरोबरच डीकॉकवर आयसीसीची आचारसंहिता लेव्हल १ नुसार कारवाई झाली असून त्याला दंड म्हणून त्याच्या सामना शुल्कामध्ये २५% कपात आणि त्याला एक डिमेरिट पॉइंट्स मिळाला आहे.

काय होते वॉर्नर- डीकॉक वाद प्रकरण ?

डरबनमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांतील खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जात असताना ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक यांमध्ये काही वाद सुरू होते.

यामागचे सीसीटीव्ही फूटेजही बाहेर आले. त्यात स्पष्टपणे दिसत आहे की ड्रेसिंग रुममध्ये परत आल्यावर डेव्हिड वॉर्नर डीकॉकवर काही कारणास्तव खूपच संतप्त होता. ते कारण म्हणजे प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, डीकॉकने वॉर्नरच्या बायकोबद्दल चुकीचे बोलले होते, असे होते .

दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा व टिम पेनपुढे जाऊन वॉर्नरला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण वॉर्नर इतका संतापला होता की तो परत येऊन डीकॉकशी बोलत होता.

माजी खेळाडूंनी पुढे येवून हा वाद शमण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यात आॅस्टेलियाचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ आणि शेन वार्न यांनी हा प्रयन्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment