---Advertisement---

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर २ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नर म्हणाला…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2020 8:04 PM
---Advertisement---

शुक्रवारी (21 फेब्रुवारी) जोहान्सबर्ग येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia Vs South Africa) संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिला सामना होणार आहे. त्यामुळे चेंडू छेडछाड प्रकरणानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David warner) आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) दक्षिण आफ्रिकेत खेळताना दिसणार आहेत.

मार्च 2018 मध्ये केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यातील चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात दोषी आढळलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि माजी उपकर्णधार डेविड वॉर्नरला (David Warner) 1 वर्षासाठी, तर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला (Cameron Bancroft) 9 महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निलंबित केले होते.

पण या निलंबनाचा कालावधी पूर्ण करत स्मिथ आणि वॉर्नरने मागीलवर्षी विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. मात्र या दरम्यान त्यांना प्रेक्षकांकडून लक्ष्य केले जात होतो.

आता या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नर जवळजवळ 2 वर्षांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण यावेळीही त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या प्रेक्षकांकडून लक्ष्य केले जाण्याचीही शक्यता आहे.

पण प्रेक्षकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन चांगली कामगिरी करण्यावरच लक्ष असणार आहे, असे वॉर्नरने स्पष्ट केले आहे.

डाव्या हाताचा दमदार फलंदाज वॉर्नरने सिडनी रेडिओ स्टेशनशी बोलताना म्हटले आहे की, “प्रेक्षकांना सामोरे जाणे कठीण असते. परंतु, मला याचा अधिक फरक पडत नाही. मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना अधिकाधिक धावा करून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करेन.”

“यापुर्वी आम्हाला इंग्लंडमध्ये प्रेक्षकांच्या बोलण्याचा सामना करावा लागला. आशा आहे की, यावेळी आम्हाला थोडासा आदर दर्शविला जाईल.” असेही पुढे तो म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---