विराट कोहलीला झालेल्या दुखापतीमुळे आरसीबीचे कर्णधारपद कोणाकडे द्यायचे हा प्रश्न आरसीबी व्यवस्थापना समोर उभा राहिला. या जागेसाठी दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डिव्हिलियर्सची चर्चा होत होती. पण पाठीच्या दुखण्यामुळे तोही अनफिट आहे असे दिसून येत आहे.
आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना खांद्याच्या दुखापतीमुळे मागील वर्षाचा ऑरेंज कॅप विजेता विराट कोहली मुकणार असल्यामुळे आरसिबी व्यवस्थापने पुढे हा प्रश्न उद्भवला होता पण आता पहिल्या चार सामन्यानसाठी तरी वॉटसनचं कर्णधारपद सांभाळणार हे नक्की .
बंगलोरसाठी वॉटसनचे हे दुसरे पर्व आहे, या आधी तो राजस्थानच्या संघाकडून खेळत होता. पण राजस्थान संघावर दोन वर्षांची बंदी आल्यानंतर बंगलोरने वॉटसनला ९.५ कोटी मध्ये विकत घेतले होते. आता वॉटसन या दुखापतग्रस्त बंगलोर संघाचे नेतृत्व कसे करतो याची उत्सुकता सगळयांनाच लागली आहे.