---Advertisement---

शेवटी ठरलचं! आता या संघासाठी खेळणार डेव्हिड वॉर्नर

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 8:08 PM
david-warner
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. वॉर्नरला युएईत होणाऱ्या इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये खेळण्यासाठी कोट्यावधी रुपयांची ऑफर दिली गेल्याचे वृत्त माध्यमांमध्ये होते. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगमधून माघार घेणार असे बोलले जात होते. आता या संपूर्ण प्रकरणावर एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे.

काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी वृत्त दिले होते की, डेव्हिड वॉर्नर याला जानेवारी महिन्यात युएईत होणाऱ्या इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये खेळण्यासाठी तीन वर्षाकरिता तब्बल १७ कोटी रुपयांची ऑफर दिली गेली आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते.‌ मात्र, त्याचवेळी सुरू होणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये त्याला खेळता येणार नव्हते. त्यामुळे पैसा की देश अशी द्विधा मनस्थिती त्याच्यापुढे उभी ठाकली होती.

हे संपूर्ण प्रकरण चालू असतानाच आता ऑस्ट्रेलियातील एका मुख्य वृत्तपत्राने बातमी दिली आहे की, वॉर्नर यावर्षी इंटरनॅशनल लीग टी२० खेळणार नाही. त्याऐवजी तो बिग बॅशमध्ये सिडनी थंडर्स संघासाठी खेळताना दिसून येईल. त्यामुळे तब्बल ८ वर्षानंतर वॉर्नर बिग बॅशमध्ये पुनरागमन करेल. २०१३-२०१४ मध्ये तो अखेरच्या वेळी ही लीग खेळला होता.

टी२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर याला टी२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी युएईत झालेल्या टी२० विश्वचषकात तो स्पर्धेचा मानकरी ठरला होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो मागील १२ वर्षापासून एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्याच्याच नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी

टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…

ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---