भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वनडे मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाने २८ षटकात लक्ष्य पूर्ण केले होते. दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठा पराक्रम केला आहे.
रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली होती. या दोघांनी ही त्याला निराश केले नाही. आपल्या किरकीच्या तालावर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाचवत एकाच डावात दोघांनी मिळून ७ गडी बाद केले. युझवेंद्र चहलने ४ गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदरने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
यासह भारतीय फिरकी गोलंदाजांची २०१५ पासून मायदेशात ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. हा पराक्रम त्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर केला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी ८ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. हा पराक्रम भारतीय गोलंदाजांनी विशाखापट्टणमच्या मैदानावर केला होता. तर याच मैदानावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी ६ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
भारतीय संघाचा ६ गडी राखून विजय
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन होल्डरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर फॅबियन ॲलेनने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला अवघ्या १७६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :
विश्वचषकविजेत्या ‘यंग इंडिया’चा होणार गौरव! बीसीसीआयने केली जंगी तयारी
दणदणीत विजयानंतरही रोहित असमाधानी; म्हणतोय, “त्या दोन गोष्टी…”
२०२२ मध्ये रोहित पर्व! नेतृत्व हाती घेताच मिळवून दिला वर्षातील पहिला विजय