बंगळुरू कसोटीतील पराभवानंतर जेव्हा टीम इंडियानं मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी वॉशिंग्टन सुंदरला संघात पाचारण केलं, तेव्हा तो मास्टरस्ट्रोक ठरेल असं कुणालाही वाटलं नसेल. पुणे कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जेव्हा कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला, तेव्हा या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र सुंदरनं आपल्या गोलंदाजीनं सर्व टीकाकारांना गप्प केलं आहे.
पुणे कसोटीच्या पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं एकूण 7 बळी घेतले. हा त्याचा कसोटी क्रिकेटमधील पहिला फाईव्ह विकेट हॉल आहे. सुंदरनं या सामन्यात किवी फलंदाज रचिन रवींद्रला ज्याप्रकारे बाद केलं, त्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. सुंदरचा हा चेंडू या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम चेंडू म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. सुंदरनं रचिनला ज्या पद्धतीनं बाद केलं, ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावणारा रचिन रवींद्र दुसऱ्या कसोटीतही शतकाच्या मार्गावर होता. मात्र वॉशिंग्टन सुंदरनं त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. रचिन 105 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.
या मालिकेत रचिन ज्या पद्धतीनं फलंदाजी करत होता, ते पाहता तो अशाच शानदार बॉलनं बाद होऊ शकला असता. वॉशिंग्टननं राऊंड द विकेट येऊन ज्या पद्धतीनं चेंडू टाकला, तो रचिनला अजिबात समजला नाही. रचिन बॉल खेळण्यासाठी पुढे सरसावला, पण तो डिफेंड करू शकला नाही आणि बोल्ड झाला.
🚨 MAIDEN FIVE WICKET HAUL FOR WASHINGTON SUNDAR IN INTERNATIONAL CRICKET 🚨
– Series on the line, Washi dominating New Zealand. pic.twitter.com/6ACptd9iiQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 24, 2024
या विकेटनंतर किवी संघाची पडझड सुरू झाली. किवी संघाची ही चौथी विकेट होती. यानंतर सुंदरनं एकापाठोपाठ एक टॉम ब्लंडेल, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स आणि टीम साऊदी यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टनं सुंदरनं या सामन्यात 59 धावा देऊन एकूण 7 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हेही वाचा –
पाकिस्तानात जन्म, स्कॉटलंडमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण; आता मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड!
टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कर्णधार बाहेर
SA VS BAN; विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने WTC मध्ये घेतली मोठी झेप, टीम इंडियाचे टेन्शन वाढले?