वॉशिंग्टन सुंदर याने त्याच्या बॅटने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारत जबरदस्त फलंदाजी केली. तो एक अष्टपैलू असून या सामन्यात त्याची फलंदाजी पाहण्याजोगी होती. शेवटच्या षटकात त्याने एक असा शॉट खेळला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) खेळला गेला. हा सामना ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताच्या सातव्या क्रमांकाच्या फलंदाजाने मैदानाच्या चौफेर शॉट्स मारले. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हा तो फलंदाज असून त्याने या सामन्यात 231.25च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
झाले असे की, भारताच्या डावात 49वे षटक टाकण्यास मॅट हेन्री (Matt Henry) आला. त्याने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर सुंदरने स्कूप शॉट खेळत चार धावा घेतल्या. हा शॉट खेळताना तो आपला संतुलनही हरवून बसला, ज्यामुळे तो जमिनीवर पडला. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Washington Sundar magic with bat. pic.twitter.com/NBlnO0iBvD
— Johns. (@CricCrazyJohns) November 25, 2022
वॉशिंग्टनने टीम साउदी, ऍडम मिल्ने आणि हेन्री यांच्या गोलंदाजीवर षटकार खेचले. या सामन्यात असे वाटले की भारत 280च्याही पुढे जाणार नाही, मात्र वॉशिंग्टनने 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या आणि भारताने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धावासंख्या उभारली.
वॉशिंग्टनने अय्यरच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 22 चेडूंत 46 धावांची भागीदारी केली. अय्यरने 76 चेंडूत 80 धावांची उत्तम खेळी केली. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याचबरोबर कर्णधार शिखर धवन याने शुबमन गिल याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. यामध्ये धवनने 72 धावा आणि गिलने 50 धावा केल्या.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी भारताच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली आणि 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टॉम लॅथम याने नाबाद 145 धावा केल्या. ज्यामुळे संघाने 7 विकेट्सने सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विलियम्सनने नाबाद 94 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत धवन-गिल जोडी सुपरहिट! आकडेवारी पाहून तुम्हालाही येईल चक्कर
किवींच्या भूमीवर श्रेयस अय्यरची ऐतिहासिक खेळी! फिफ्टी करताच धोनीला टाकले मागे