आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मधील पाकिस्तानच्या चालू असलेल्या ‘फ्लॉप शो’ वर पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम चांगलाचेच भडकले आहेत. त्यांनी पाकिस्तानचा संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझम याच्यावर निशाणा साधला आहे की, त्याने संघाची निवड करताना स्वतःची भूमिका योग्यपणे मांडली नाही.
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने आपला दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध गमावला. भारताविरूद्ध पहिल्या सामन्यात चार विकेट्सने पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी संघ झिम्बाब्वे संघाविरूद्ध देखील विजयाची नोंद करू शकला नाही. या सामन्यात शेवटी अवघ्या एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे तमाम माजी पाकिस्तानी खेळाडूंनी बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला चांगलचं निशाण्यावर धरलं आहे. वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी तर लाइव्ह शोमध्ये त्याच्यावर ताशेरे ओढले.
वसीम अक्रम एका स्पोर्ट्स चॅनलच्या लाइव चर्चेत म्हटले की,”एका वर्षापासून पाकिस्तानातील सर्व लोक, ज्यात आमचा देखील समावेश आहे, म्हणत आहोत की फलंदाजांची मधली फळी कमकुवत झालेली आहे. आता इथे जो मुलगा बसला आहे शोएब मलिक ( Shoeb Malik). जर मी कर्णधार असतो, तर विश्वचषक कसा जिंकायचा हे माझं अंतिम लक्ष्य असतं. जर त्यासाठी मला गाढवाला बाप बनवावं लागतं असेल तर मी ते सुद्धा करेल. कारण, माझं स्वत:च लक्ष्य गाठायचं आहे, मला विश्वचषक जिंकायचा आहे. जर मला माझ्या संघात शोएब मलिक पाहिजे, तर मी निवड समितीशी भांडेल की मला शोएब मलिक माझ्या संघात पाहिजे, नाहीतर मी संघाच नेतृत्व करणार नाही.”
लागोपाठ झालेल्या दोन पराभवानंतर पाकिस्तानची उपांत्यफेरी गाठण्याची समीकरणे जरा अवघडच झाली आहेत. यानंतर त्यांचा सामना 30 ऑक्टोबरला नेदरलॅंड्ससोबत पर्थ याठिकाणी आहे. जर या सामन्यात पाकिस्तान विजय मिळवण्यात यशस्वी झाला तरचं त्यांची उपांत्य फेरीत पोहचण्याची आशा पल्लवीत राहील. त्यानंतर पाकिस्तानचा सामना दक्षिण अफ्रीका आणि बांग्लादेश या संघाशी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
स्म्रिती मंधानाने स्वतःला दिले स्पेशल दिवाळी गिफ्ट, महागड्या गाडीचे फोटो होत आहेत व्हायरल
भारतीय यष्टीरक्षक कार्तिककडून मोठी चूक, प्रेक्षकांनी लावल्या ‘धोनी…धोनी’च्या घोषणा