---Advertisement---

पाकिस्तानी दिग्गजाने मान्य केले हार्दिकचे मोठेपण! म्हणाला, “तो जगात सर्वोत्तम”

On: सोमवार, ऑगस्ट 29, 2022 8:47 PM
IND-vs-Pak-Win-Moment
---Advertisement---

भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार व दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांचे देखील नाव जमा झाले आहे.

या हाय व्होल्टेज सामन्यात सामनावीर ठरलेल्या हार्दिकने प्रथम गोलंदाजी ‌करताना आपल्या 4 षटकात फक्त 25 रन देऊन पाकिस्तानचे रिझवान, दिलखुश आणि इफ्तिकार हे तीन महत्त्वाचे फलंदाज टिपले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत असताना अगदी कोणताही खराब फटका न मारता सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना 17 चेंडूमध्ये 4 चौकार आणि एक षटकार मारत त्याने भारतीय संघाला दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रसारण वाहिनीशी बोलताना अक्रम यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,

“माझ्या मते, हार्दिक पंड्याला माहित आहे की, तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. ते त्याच पद्धतीने खेळतो. त्याची मानसिकताही तशीच आहे. तो 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. तसेच, जेव्हा तो फलंदाजीसाठी येतो तेव्हा तो तेथेही आक्रमक फलंदाजी करतो.”

हार्दिक पंड्या हा आयपीएल 2022 पासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्याच नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलच्या विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका आपल्या नावे केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने साध्य केलेल्या शिखराचे माजी दिग्गजाकडून कौतुक! म्हणाला, ‘तुला आणखी खेळताना…’
तयार रहा! रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक थरार? अशी आहेत समीकरणे
हार्दिकच्या ‘कडक’ कामगिरीनंतर आनंदला माजी भारतीय क्रिकेटर; ट्विट करत म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---