---Advertisement---

“विराट माझ्या स्वप्नात येतो”, पाकिस्तानी दिग्गजाने केला मोठा खुलासा

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 4:03 PM
Virat Kohli Bowling
---Advertisement---

सध्या श्रीलंकेत आशिया चषक क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान या सुपर 4 या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असून, याची उत्सुकता वाढली आहे. मात्र, पावसामुळे हा सामना दुसऱ्या दिवशी शिफ्ट करण्यात आला. असे असताना प्रसारण वाहिनीवर बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे दुसऱ्या दिवशी ढकलण्यात आला ‌ त्यावेळी प्रसारण वाहिनीवर होत असलेल्या चर्चेदरम्यान तो म्हणाला,

“मी काही वेळापूर्वी ज्यावेळी मैदानात गेलो होतो त्यावेळी विराट माझ्यापाशी आला होता. मी बोलताना त्याला म्हटलं की तू माझ्या स्वप्नात येत असतो. त्यावेळी तो म्हणाला याचा अर्थ काय? त्यावेळी त्याला सांगितले की तुला वारंवार टेलिव्हिजनवर पाहतो. त्यामुळे तू माझ्या नजरेसमोरून जातच नाही.” ‌

यापूर्वी देखील अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू विराटचे कौतुक करताना दिसले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा विचार केल्यास, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या आहेत. कर्णधार  रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी केली. मात्र, अर्धशतके केल्यानंतर ते बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव पुढे नेला‌. मात्र, त्यानंतर पाऊस आला आणि पुढे खेळ होऊ शकला नाही. सामना रात्री 9 वाजता सुरू होऊन 34-34 षटकांचा खेळ होणार होता. परंतु पुन्हा एकदा पाऊस पडला आणि सामना राखीव दिवशी गेला.

(Wasim Akram Said Virat Comes In My Dreams)

महत्वाच्या बातम्या – 
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
आशिया कपमध्ये पाऊस आणि ट्रोल होतायेत जय शाह! काय आहे कारण? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---