---Advertisement---

“इंग्लंड जखमी सिंहासारखा…” भारताविरुद्धच्या सामन्याआधी दिग्गजाचे मोठे विधान

On: बुधवार, ऑक्टोबर 25, 2023 7:42 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध आपला पुढचा सामना 29 ऑक्टोबरला खेळायचा आहे. या सामन्याबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात भारतीय संघ माझा आवडता आहे पण इंग्लंड जखमी सिंहाप्रमाणे पलटवार करण्याचा प्रयत्न करेल असे त्याने म्हटले आहे.

2023 च्या विश्वचषकात भारत आणि इंग्लंडची कामगिरी पूर्णपणे वेगळी राहिली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाचपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि सध्या ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत, पण दुसरीकडे जर आपण इंग्लंडबद्दल बोललो, तर त्यांनी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे आणि ते गुणतालिकेत तळाला आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला पराभूत करून पुढे जाण्याचा इंग्लंड सर्वतोपरी प्रयत्न करेल. जर इंग्लिश संघ हा सामना हरला तर उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा पूर्णपणे मावळतील.

वसीम अक्रम (Wasim Akram) याच्या मते, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा वरचष्मा राहिल. मात्र, इंग्लंड संघ जोरदार पलटवार करू शकतो. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला, “भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध जिंकण्यासाठी पुर्णपणे सक्षम आहे. पण, इंग्लंड सध्या जखमी सिंहासारखा आहे. त्यांना माहीत आहे हा सामना कसल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे आणि त्यामुळेच ते हा सामना वेगळ्या पद्धतीने खेळतील. भारताने बऱ्यापैकी नियंत्रण राखून आक्रमक खेळ केला आहे.”

लखनऊमध्ये इंग्लंड विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला मोठा झटका बसू शकतो. कारण संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya) या सामन्यातूनही बाहेर पडू शकतो. हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही भाग घेऊ शकला नाही आणि त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात येऊ शकते?.

महत्वाच्या बातम्या – 

नाद नाद नादच! सलग दुसऱ्या सामन्यात वॉर्नरचा शतकी तडाखा, विश्वचषकातील ठरलं सहावं शतक

अफगाणिस्तानच्या विजयावर धमाकेदार डान्स करणाऱ्या इरफानला मिळाली खास भेट, इंस्टावरून दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---