---Advertisement---

आयपीएल बाबत वसीम अक्रमचा टोमणा, म्हणाले…

On: मंगळवार, डिसेंबर 9, 2025 3:51 PM
---Advertisement---

लंडनच्या प्रतिष्ठित लॉर्ड्स मैदानावर पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा ग्लोबल रोडशो आयोजित करण्यात आला होता. तथापि, पीएसएलच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या या शोमध्ये इतरच कारणामुळे लक्ष वेधून घेतले. व्यासपीठावर उपस्थित असलेले दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यांनी अचानक इंडियन प्रीमियर लीग (IPL) वर गंमतीदार टीका केली. विशेष म्हणजे, त्यांनी बाबर आझम, मोहसिन नक्वी आणि इतर अनेक खेळाडूंच्या उपस्थितीत हे विधान केले.

पिसीबीने 2026 च्या सीझनपूर्वी दोन मोठे सत्र आयोजित केले. पहिल्या सत्रामध्ये पिसीबी चेअरमन मोहसिन नक्वी, वसीम अक्रम, रमीझ राजा आणि पीएसएल सीईओ यांचा समावेश होता. दुसऱ्या भागात बाबर आझम, हारिस रौफ आणि इतर स्टार खेळाडू व्यासपीठावर आले. याच वेळी अक्रम हसत हसत म्हणाले की, आयपीएल इतकी लांब चालते की “मुले मोठी होतात, पण लीग काही संपत नाही.” त्यांनी आयपीएलच्या दोन महिन्यांपेक्षा जास्त चालणाऱ्या कॅलेंडरची तुलना पीएसएलच्या साधारण 35-40 दिवसांच्या संक्षिप्त फॉर्मेटशी केली.

अक्रमने दावा केला की, विदेशी खेळाडू देखील कमी वेळेच्या लीगला प्राधान्य देतात, कारण जास्त कालावधीसाठी उपलब्ध असणे त्यांच्यासाठी कठीण असते. ते म्हणाले, “35-40 दिवस सगळ्यांसाठी एकदम योग्य आहेत. यापेक्षा जास्त वेळेत सगळे कंटाळतात, मी सुद्धा!” त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (BBL) चे उदाहरण दिले आणि सांगितले की बीबीएल देखील सुरुवातीला लांब होती, पण नंतर कमी वेळेत पूर्ण केली गेली. कारण याचा परिणाम प्रेक्षक आणि खेळाडू दोघांवरही होत होता.

अक्रमने आणखी एक दावा केला की, विदेशी खेळाडू पीएसएल मधील गोलंदाजीच्या स्तराची (level of bowling) प्रशंसा करतात. त्यांच्या मते PSL मध्ये “क्वालिटी आहे, क्वांटिटी नाही.” ते म्हणाले की अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू गोलंदाजीच्या प्रतिभेच्या दृष्टीने पीएसएलला नंबर 1 मानतात. मात्र, त्यांनी हे देखील मान्य केले की लोकप्रियता आणि व्यवसायाच्या (business) बाबतीत आयपीएल आजही जगातील नंबर-1 लीग आहे. त्यांनी पीएसएल ला “दुसऱ्या नंबरवर” ठेवले, परंतु सांगितले की भविष्यात ही लीग आणखी मोठ्या स्तरावर पोहोचू शकते.

मोहसिन नकवी यांनी रोडशोमध्ये सांगितले की, पीसएलला जगातील सर्वात मोठी लीग बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर, रमीझ राजा यांनी पीएसएलला युवा पाकिस्तानी खेळाडूंसाठी “करिअर बदलून टाकणारा प्लॅटफॉर्म” असल्याचे सांगितले. पीएसएलचा हा रोडशो जागतिक स्तरावर (Global Level) खूप यशस्वी झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---