मुंबई । भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने भारताकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातला होता. आपल्या बॅटने विरोधी संघातल्या भल्याभल्या गोलंदाजांची पिसे काढणारा सेहवाग परिस्थिती कशीही असो आक्रमक खेळण्यावर भर द्यायचा. सेहवाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची झलक युवा खेळाडू पृथ्वी शॉ मध्ये दिसते, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने दिली आहे.
पृथ्वी शॉ 2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकापासून प्रसिद्धीच्या झोतात आला. विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मिळालेली संधी त्याने दोन्ही हाताने पकडत संधीचे सोनं केले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला.
मात्र त्यानंतर तो फिटनेस आणि डोपिंगमध्ये तो फसला. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबलं. परंतू त्यावरही मात करत त्याने यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण केले.
आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनल आकाशवाणीमध्ये बोलताना वसीम जाफरने पृथ्वी शॉची तुलना विरेंद्र सेहवाग बरोबर केली आहे. “तो एक शानदार खेळाडू आहे. यात शंका नाही. तो फटके मारताना सेहवागची आठवण करून देतो. त्याच्यामध्ये सेहवागसारखी क्षमता आहे. कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजीचा सामना तो सहजतेने करत विरोधी संघाचे मनसुबे उधळून लावू शकतो,” असे जाफर म्हणाला.
“न्यूझीलंड दौऱ्यात तो शॉर्ट डिलिव्हरीवर दोनदा बाद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या जाळ्यात तो फसला गेला. तेथे त्याला बॅकफूटवर खेळणे गरजेचे होते. पृथ्वी शॉने ऑफ फिल्डवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे,” असा सल्ला देखील वसीम जाफरने दिला.
स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंड दौऱ्यात तो कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सलामीला खेळला आहे. 3 वनडे सामन्यात त्याने अनुक्रमे 20, 24, 40 धावा केल्या, तर कसोटीच्या चार डावात त्याने एक अर्धशतक ठोकले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
दादा म्हणतो, सध्याच्या टीम इंडियातील हे ५ खेळाडू शंभर टक्के खेळले असते माझ्या संघात
ENG vs WI Test: वेस्ट इंडिजच्या संघाने पुन्हा तोडला आयसीसीचा नियम, नक्की काय केले होते खेळाडूंनी
लॉकडाउनमुळे मोहम्मद शमीचे झाले सर्वात मोठे नुकसान, वाचा काय शमीबरोबर