इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ३९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमने सामने होते. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण गेल्या २ सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करत रोहित शर्माच्या चिंतेत वाढ केली आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे.
परंतु या मोठ्या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे चाहते भलतेच खुश झाले होते. तसेच संघातील खेळाडूंनी देखील ड्रेसिंग रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन केले आहे, ज्याचा व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
विराट कोहलीने या विजयानंतर हॅट्रिक घेणाऱ्या हर्षल पटेलचे कौतुक केले आहे. तसेच अर्धशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलचेही तोंडभरून कौतुक केले. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये व्हिडिओच्या शेवटी एबी डिविलीयर्स विराट कोहलीची नक्कल करताना दिसून येत आहे.
विराट हा मैदानावर खूप आक्रमक असतो. त्यामुळे त्याचे सेलिब्रेशन देखील हटकेच असते. एबी डीविलीयर्सने देखील विराटच्या या सेलिब्रेशनची हुबेहूब नक्कल केली आणि तो उड्या मारून जल्लोष देखील साजरा करताना दिसून आला आहे. हे पाहून कर्णधार विराट कोहली देखील भलताच खुश झाल्याचे दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
हा सामना झाल्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला की, “खूप आनंद होत आहे, मुखतः आम्ही ज्याप्रकारे विजय मिळवला आहे त्याचा जास्त आनंद होत आहे. आमची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण देवदत्त पडीक्कल लवकर बाद झाला होता. परंतु त्यानंतर श्रीकर भरतने चांगली फटकेबाजी केली आणि संघावरील दबाव कमी केला. परंतु मॅक्सवेलने केलेली खेळी अविश्वसनीय होती. जर त्याने टिच्चून फलंदाजी केली नसती, तर बुमराहने त्याच्यावर दबाव टाकला असता. त्याच्याविरुद्ध तुम्हाला चांगलीच कामगिरी करावी लागते. ज्यामुळे मी त्याला १० पैकी १० गुण देतो. तसेच हर्षलने जे केले ते अविश्वसनीय होते.”
RCB v MI Dressing Room Talk
Virat’s pep talk before the match, Yuzi, Maxi & Harshal talking about their performances, Coach Hess & Virat addressing the team after the match, & an AB special to sign off on a comprehensive victory, all that & more on Game Day!#PlayBold #IPL2021 pic.twitter.com/4bH4PIUeKe
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 27, 2021
ABD Imitating Virat Celebrations🔥😍🤣 @imVkohli • #RCB • @ABdeVilliers17https://t.co/oxSmq1ftdr
— Virat Kohli Trends™ (@TrendVirat) September 27, 2021
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने ३७ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली होती. तर विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये ५१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटक अखेर ६ बाद १६५ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने एकहाती झुंज देत ४३ धावांची खेळी केली होती. तर क्विंटन डी कॉकने २४ धावांचे योगदान दिले होते. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी मुंबई इंडियन्स संघाला हा सामना ५४ धावांनी गमवावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट अन् धोनी नाही, तर ‘ही’ भारतीय क्रिकेटर आहे ‘अस्सल फिनिशर’, पाहा आकडेवारी
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पत्ता होणार का कट? ‘करा वा मरा’च्या स्थितीत अडकले ४ सामने
‘आम्हालाही इज्जत आहे, सुशिक्षित राष्ट्रांनी भारताप्रमाणे…’, शाहिद आफ्रिदी बरळला