डब्लिन। 27 जूनला भारताने आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात 76 धावांनी विजय मिळवत 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. हा सामना भारताचा 100 वा टी20 सामना होता.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचा डोंगर उभा केला होता. भारत फलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर अष्टपैलू हार्दिक पंड्याने हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार खेचला.
या षटकाराने अनेकांना माजी कर्णधार एमएस धोनीच्या फिनिशिंग टचची आठवण करुन दिली. हेलिकॉप्टर शॉटला क्रिकेटमध्ये धोनीने चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली आहे. हेलिकॉप्टर शॉट हा धोनीचा ट्रेडमार्क शॉट असल्याचे म्हटले जाते.
त्यात धोनी आता बऱ्याचदा वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याने फिनिशिंगची जबाबदारी पंड्यावर आली आहे. त्यानेही या सामन्यात धोनीचा ट्रेडमार्क असलेला हेलिकॉप्टर शॉट मारत ही जबाबदारी पार पाडल्याने सोशल मिडियावर बऱ्याच क्रिकेट चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
https://twitter.com/FanPandya/status/1012015978761334784
https://twitter.com/ChennaiIPL/status/1012011284785610753
https://twitter.com/madam_jadeja/status/1012011825100013568
https://twitter.com/Nagendra_17/status/1012010950499581952
https://twitter.com/davidakash77/status/1012012532511326209
https://twitter.com/Mr_idiottt/status/1012010514988204032
https://twitter.com/prdp251058/status/1012016585270353921
https://twitter.com/hijackervishnu/status/1012012281905868801
https://twitter.com/Sarcasmm007/status/1012012419651067904
https://twitter.com/deepsen16/status/1012014450025455616
या सामन्यात भारताचे सालामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने अनुक्रमे 97 आणि 74 धावा करत अर्धशतक झळकावले. तर गोलंदाजीत चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने 4 विकेट घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: चतुर धोनीने चहलला करुन दिली या गोष्टीची आठवण!
–कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!
–कोहली म्हणतो, ही आयडीया केली तर प्रतिस्पर्ध्यांच जगणं होईल मुश्किल!