भारतात होणाऱ्या आगामी १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकाचा थरार अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. भारतात होणाऱ्या फुटबॉलच्या महाकुंभ मेळ्यासाठीचे गीत तयार करण्यात आले आहे. ‘करके दिखा दे गोल’ असे हे थीम सॉंग आहे.
या थीम सॉंगमध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे एकत्र दर्शन दाखवण्यात आला आहे. या गीतामध्ये भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया आपली फुटबॉल कौशल्य दाखवत आहे. संगिकर आणि खासदार बाबुल सुप्रियोसुद्धा या गाण्यात गाताना दिसत आहे. या गीताच्या शेवटी इंडियन सुपर लीगमधील संघ केरला ब्लास्टर्सचा सह संघ मालक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दाखवण्यात आला आहे.
हे गीत शानने गायले असून या गीताला भारतीय फ़ुबॉलप्रेमी कितपत पसंद करतील यावर त्याने या गीताला किती न्याय दिला आहे हे ठरेल. २०१० ला दिल्ली येथे आयोजीत राष्ट्रकुल स्पर्धेचे थीम सॉन्ग ए. आर. रेहमान यांनी गायले होते. पण ते गीत अनेक रसिकांना आवडले नसल्याने रेहमान यांना टीकेचा धनी होण्याची वेळ आली होती.