कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी चांगल्या फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच शानदार क्षेत्ररक्षणाचीही गरज असते. बऱ्याचदा दमदार फलंदाजी आणि गोलंदाजी प्रदर्शनानंतर गचाळ क्षेत्ररक्षणामुळे संघ सामना गमावताना दिसले आहेत. मात्र याउलट भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात धरमशाला येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात (Second T20I) भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणात जबरदस्त कामगिरी करताना दिसले. भारताचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने चपळता दाखवत रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला विकेट मिळवून देण्यात सहकार्य (Venkatesh Iyer Catch) केले. त्याच्या या झेलची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
तर झाले असे की, भारतीय संघाला दुसऱ्या टी२० सामन्यातील पावरप्लेमध्ये श्रीलंकेची सलामी जोडी तोडता आली नाही. आठव्या षटकापर्यंत श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसांका आणि दनुष्का गुणथिलका (Danushka Gunathilaka) यांनी ५० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या. त्यानंतर डावातील नववे षटक टाकण्यासाठी फिरकी अष्टपैलू जडेजाचा तर गुणथिलकाने चांगलाच समाचार घेतला. त्याने जडेजाच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूंवर षटकार, चौकार आणि षटकार ठोकला. मात्र जडेजानेही गुणथिलकाच्या फटकेबाजीचे त्याच्याच शब्दांत उत्तर दिले. यासाठी त्याला अष्टपैलू अय्यरची साथ मिळाली.
हेही वाचा- विरोधी संघातून कर्णधार रोहितचे तोंडभरून कौतुक; श्रीलंकन दिग्गज म्हणाला, ‘नव्या लीडरशीपची…’
जडेजाच्या षटकात सलग ३ बाउंड्री मारणाऱ्या गुणथिलकाने पुढील चौथा चेंडूही सीमेपार टोलवण्याचा प्रयत्न केला. त्याने स्लॉग स्वीप शॉट मारला. परंतु त्याने मारलेला चेंडू हवेत खूप उंचावर गेल्यामुळे तो सीमारेषा पार करू शकला नाही. यावेळी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या अय्यरने हाती आलेली संधी दवडली नाही. त्याने हवेत उंचावर असलेल्या चेंडूवर बारीक लक्ष ठेवत पुढे धाव घेतली आणि अचूक झेल टिपला.
JADUGAR #JADEJA!
Much needed breakthrough for #India!
What a fabulous catch #venkateshiyer! 👏👏👏👏
Come on #TeamIndia 👏👏👏👏#SLvIND #SLvsIND #INDvSL #INDvsSL #Cricket pic.twitter.com/aC2csfK348— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) February 26, 2022
क्रिकेटमध्ये स्वर्लिंग स्कायर (Swirling Skier) (हवेत उंचावर असलेल्या चेंडूला धावत जाऊन पकडणे) झेल पकडणे खूप कठीण असते. मात्र अय्यरने अगदी सहज हे काम केले. त्यामुळे त्याच्या या झेलचे भरपूर कौतुक होते आहे. तसेच अय्यरच्या या झेलमुळे जडेजालाही पुनरागमनाची संधी मिळाली व भारतीय संघालाही या सामन्यातील पहिली विकेट मिळाले, हे विशेष.
WATCH – Venkatesh Iyer catches a skier 👏👏
Catch brilliance from Venkatesh Iyer. Not easy to take a swirling skier – but Iyer kept his calm to grab it well.
📽️📽️ https://t.co/8jN5w6ZJyT @Paytm #INDvSL
— BCCI (@BCCI) February 26, 2022
दरम्यान २७ वर्षीय वेंकटेश अय्यरने गेल्या काही सामन्यांतील त्याच्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. हा अष्टपैलू सध्या भारतीय संघासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात तो निश्चितच अष्टपैलू हार्दिक पंड्याची जागा घेईल, असा अंदाज क्रिकेट जाणकार वर्तवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघातून कर्णधार रोहितचे तोंडभरून कौतुक; श्रीलंकन दिग्गज म्हणाला, ‘नव्या लीडरशीपची…’
IND vs SL: दुसऱ्या टी२०त भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ
तंबूत गेलेल्या खेळाडूला शाकिब अल हसनमुळे मिळालं जीवदान; पण क्रिकेटरनं असं केलं तरी काय? वाचा