नागपूर। आज(5 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 50 षटकात 251 धावांचे आव्हान ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ या आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानावर एक मजेशीर गोष्ट घडली आहे. यावेळी धोनीचा एक चाहता अचानक सुरक्षा रक्षकांना भूल देत धोनीला भेटण्यासाठी मैदानात आला. पण यावेळी धोनीनेही त्या चाहत्याची मजा घेतली.
ज्यावेळी हा चाहता धोनीला भेटण्यासाठी आला त्यावेळी धोनी संघसहकाऱ्यांच्या अवतीभवती पळत होता. त्यामुळे तो चाहताही धोनीच्या मागे पळत होता. अखेर खेळपट्टीच्या जवळ आल्यावर धोनी थांबला आणि त्या चाहत्याला भेटला. या चाहत्याच्या टी-शर्टवर ‘थाला’ असे लिहिले होते, तसेच धोनीचा जर्सी क्रमांक असणारा 7 अकडाही लिहिला होता.
https://twitter.com/HaramiLaunde/status/1102904692198191104
https://twitter.com/NaveenA31272010/status/1102915325450805248
Wowww Naughty Dhoni 😍😍😍
Spreading Smile all over 💞💘#MSDhoni #Dhoni #AUSvsIND #INDvAUS #teamindia #bbccricket https://t.co/a2tj8VTY42
— `ash MSDian (@ashMSDIAN7) March 5, 2019
धोनी हा भारतातच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या लाडक्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याला जगभरातून चाहत्यांचे प्रेम मिळत असते. याआधीही बऱ्याचदा धोनीचे चाहते सुरक्षा रक्षकांची नजर चूकवून मैदानात आले आहेत.
आजच्या सामन्यात मात्र धोनीला फलंदाजीत खास काही करता आले नाही. तो फलंदाजीला आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तो वनडेमध्ये जवळजवळ 9 वर्षांनंतर पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.
या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्याने 120 चेंडूत 116 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–क्रिकेटमधील डक म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या..
–२२७ भारतीय क्रिकेटपटूंपैकी असा पराक्रम करणारा विराट चौथाच!
–तब्बल तीन संघांना विराट कोहलीने असा दिला त्रास…