भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने शनिवारी 7 जुलैला 37 वा वाढदिवस साजरा केला. तो सध्या भारतीय संघाबरोबर इंग्लंड दौऱ्यावर असल्याने त्याने त्याचा वाढदिवस संघसहकारी आणि पत्नी साक्षी आणि मुलगी झीवा यांच्या उपस्थितीत साजरा केला.
त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की केक कापल्यावर युजवेंद्र चहल, कुलदिप यादव आणि सुरेश रैना यांनी धोनीच्या चेहऱ्याला केक लावला. त्यानंतर लगेचच धोनीनेही कुलदिपला केक लावत मस्ती केली.
याबरोबरच या व्हिडिओत झीवा आणि साक्षी या धोनीला केक भरवताना दिसत आहेत.
धोनीने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ‘संपूर्ण वर्षभर बॉसगिरी केल्यावर अखेर त्याचा बदला घेण्याची या खेळाडूंना संधी मिळते तेव्हा असे होते. माझा हा दिवस खास बनवल्याबद्दल धन्यवाद’
https://www.instagram.com/p/Bk7wL1sHAzf/?hl=en&taken-by=mahi7781
त्याचबरोबर धोनीला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय संघातील खेळाडूंनीही त्याला शुभेच्छांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. ज्यात धोनीची मुलगी झीवाही धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसते.
SPECIAL: From his teammates to someone very very special, wishes galore for @msdhoni as he celebrates his 37th birthday. Watch it till the end – Cuteness Alert! #HappyBirthdayMSDhoni
LINK—->https://t.co/wT27zi4Bx1 pic.twitter.com/YPupnjLVwz— BCCI (@BCCI) July 7, 2018
#TeamIndia has reached Bristol and upon arrival it is time to celebrate🎂#HappyBirthdayMSDhoni pic.twitter.com/298C0Ti9eQ
— BCCI (@BCCI) July 7, 2018
तसेच धोनीच्या पत्नीनेही धोनीला भावनिक संदेश लिहित विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Bk6H7GdllWd/?hl=en&taken-by=sakshisingh_r
महत्त्वाच्या बातम्या:
-२०१० साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मोठ्या घटनेचा खुलासा
-काय सांगता! धोनीवर पुन्हा चित्रपट बनणार?