मुंबई। सोमवारी(29 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 224 धावांनी विजय मिळवला. भारताकडून रोहित शर्मा आणि अंबाती रायडूने शतकी खेळी केली. तर खलील अहमद आणि कुलदीप यादवने प्रत्येेेकी 3 विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात भारताच्या विजयाबरोबरच रविंद्र जडेजा आणि भारताचा कर्णधार विरा़ट कोहलीमध्ये मैदानावरच एक छोटी पण मजेदार शर्यत बघायला मिळाली.
ही शर्यत भारताने दिलेल्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग विंडीजचा संघ करत असताना पहायला मिळाली . विंडीजच्या डावात पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीवीर फलंदाज चंद्रपॉल हेमराजने आॅफ साइडला फटका मारल्यानंतर तो चेंडू चौकार जाण्यापासून अडवण्यासाठी विराट धावला.
पण त्याने मधेच जडेजालाही धावताना पाहिले. त्यानंतर ते दोघेही चेंडूमागे सोबत पळाले. अखेर विराटने त्याचा वेग कमी केला आणि जडेजाने पुढे जात तो चेंडू अडवत कोहलीकडे सोपवला.
त्यांच्या या छोट्या शर्यतीचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे.
The running race – Jadeja vs Kohli https://t.co/JnNcFpp0aD #INDvWI
— Deepak Verma (@dpakwa) October 29, 2018
विंडीजकडून कर्णधार जेसन होल्डरने नाबाद 54 धावा करत एकाकी लढत दिली. पण अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने विंडीजला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–चौथ्या वनडेत भारताचा विंडीजवर २२४ धावांनी शानदार विजय
–ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा
–कोणत्याही संघाला न जमलेला पराक्रम भारतीय संघाने केला