---Advertisement---

..म्हणूनच इंडियन सर्वांच्या हृदयावर राज्य करतात! शतकवीर सिकंदरची भारतीय खेळाडूंनी थोपटली पाठ

Indian-Players-Appriciating-Raza
---Advertisement---

बऱ्याचदा भारतीय क्रिकेटपटू लाईव्ह सामन्यात किंवा मैदानाबाहेर विरोधी संघातील खेळाडूंसोबत, चाहत्यांसोबत खिलाडूवृत्ती दाखवत मने जिंकत असतात. असाच काहीसा प्रसंग भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात हरारे येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यातही पाहायला मिळाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा याने प्रशंसनीय खेळी केली. त्याच्या या खेळीचे भारतीय खेळाडूंनी पाठ थोपटत कौतुक केले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोमवारचा (२३ ऑगस्ट) दिवस भारताचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) आणि झिम्बाब्वेचा विस्फोटक फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza) यांनी गाजवला. या स्टार फलंदाजांनी धुव्वादार शतके केली. प्रथम फलंदाजी करताना गिलने ९७ चेंडूत १ षटकार आणि १५ चौकार मारत १३० धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेपुढे २९० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ २७६ धावांवर सर्वबाद झाला. मात्र झिम्बाब्वेचा फलंदाज सिकंदर रझाने शानदार शतक करत सर्वांची मने जिंकली.

रझाने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ९५ चेंडूत ११५ धावा चोपल्या. या खेळीसाठी त्याने ३ षटकार आणि ९ चौकारही मारले. त्याच्या या मॅरेथॉन खेळीवर शुबमनने अंकुश लावला. शुबमनने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर लॉन्ग ऑनला बाउंड्रीजवळ त्याचा नेत्रदीपक झेल टिपला. शतक करूनही संघ विजयाच्या नजीक असताना बाद झाल्याने रझाचा चेहरा पडला. परंतु रझाने खेळीने प्रभावित झालेले भारतीय खेळाडू त्याचे कौतुक करायला चुकले (Indian Players Appriciated Sikandar Raza) नाहीत.

रझा बाद झाल्यानंतर फिरकीपटू कुलदीप यादव, यष्टीरक्षक इशान किशन यांनी त्याला घेरा घालत त्याची पाठ थोपटली. बाउंड्रीजवळ असलेल्या शुबमननेही त्याचे कौतुक केले. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी भारतीय खेळाडूंच्या या वृत्तीसाठी त्यांची प्रशंसा केली आहे.

दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर २८९ धावा केल्या होत्या. त्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ २७६ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी भारताने १३ धावांनी हा सामना गमावला आणि ३-० च्या फरकाने मालिका जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---