नॉटिंगहॅम | नॉटिंगहॅमशायर विरुद्ध हॅम्पशायर काऊंटी क्रिकेटच्या सामन्यात काल नॉटिंगहॅमशायरचा पहिला डाव ६९.३ षटकांत ३०२ धावांवर संपुष्टात आला. यानंतर जेव्हा हॅम्पशायर फलंदाजीला आले तेव्हा स्लिपमध्ये एक अजब कॅच चाहत्यांना पहायला मिळाला.
जो वेदरली हा हॅम्पशायरचा फलंदाज जेव्हा १२ धावांवर खेळत होता तेव्हा त्याचा स्टुअर्ट ब्राॅडच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेल उडाला.
Read- धोनी जगात कुणालाही षटकार मारु शकतो पण या गोलंदाजाला नाही
हा झेल जो खेळाडू दुसऱ्या स्लिपमध्ये होता त्याच्याकडे गेला होता, परंतु चेंडूचा वेग जास्त असल्यामुळे त्याला काही समजायच्या आत हा चेंडू तिसऱ्या स्लिपमधील राॅस टेलरकडे गेला. यामुळे तो चांगलाच गोंधळला. त्याचवेळी हा झेल टिपण्यासाठी पहिल्या स्लिपमधील खेळाडूने टेलरच्या बाजूला झेप घेतली.
या सर्व गोंधळात दोन टप्पे घेत अखेर चेंडू टेलरच्या हातात स्थिरावला.
REPLAY | Watch top left as Ross Taylor somehow manages to hold on to the ball to remove Weatherley #NottsvHants pic.twitter.com/9q4KiNSWpY
— Nottinghamshire CCC (@TrentBridge) May 4, 2018
याच सामन्यात टेलरने काल ७७ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.






