आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा २० वा सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये सोमवारी (२१ मार्च) पार पडला. पाकिस्तान महिला संघाने हा सामना ८ विकेट्सने जिंकला. बिस्माह मरुफच्या नेतृत्वाखाली संघाने ४ सामन्यांतील पराभवानंतर हा पहिला सामना जिंकला आहे. तसेच आयसीसी महिला विश्वचषकामध्ये पाकिस्तान संघाला १८ पराभवानंतर पहिलाच विजय मिळाला आहे.
पाकिस्तानने अनुभवी गोलंदाज निदा डारच्या शानदार गोलंदाजी आणि सलामीवीर मुनिबा अलीच्या छोट्या परंतु फायदेशीर खेळीमुळे वेस्टइंंडिजविरुद्ध (Pakitan vs West Indies) हा सामना जिंकला होता. कर्णधार बिस्माह मारुफ या विजयानंतर आनंदी असल्याचे दिसली. तिने आपली ७ महिन्यांची मुलगी फातिमाला (Fatima) हवेत भिरकावत आनंद साजरा केला आहे. तिचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बिस्मान मारुफ सामना जिंकल्यानंतर तीच्या मुलीला म्हणजेच फातिमाला हवेत फेकताना दिसली. सोशल मिडीयावर माय-लेकीच्या या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे. चाहते बिस्माह मारूफचे कौतुक करताना दिसत आहेत. तिने गरोदर असताना क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. परंतु पतीच्या पाठिंब्यामुळे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी तिने खेळण्याचा निर्णय घेतला.
https://www.instagram.com/reel/CbXVufTFKq9/?utm_source=ig_embed&ig_rid=95ae3f91-587c-41ce-ada9-879d85608596
पावसामुळे मैदान ओले झाल्यामुळे हा सामना २०-२० षटकांमध्ये खेळवण्यात आला होता. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला येत वेस्ट इंडिज संघाने ७ विकेट्स गमावत ८९ धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाने हे लक्ष्य २ विकेट्स गमावत १८.५ षटकांतच पूर्ण केले होते. यासोबतच पाकिस्तान संघ विश्वचषक २०२२ मध्ये आपले खाते खोलण्यात सुद्धा यशस्वी झाला आहे. संघ सध्या गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहे. २००९ नंतर पाकिस्तान महिला संघाने विश्वचषकात पहिलाच सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: लेकीसंगे डान्स, कॅमेरामॅनसोबत मस्ती; ‘हिटमॅन’ रोहितची कधीही न पाहिलेली बाजू
क्रिकेटसाठी काय पण! कुटूंबीय आजारी असूनही शाकिब दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरणार मैदानात
केवळ ३० धावा करूनही मंधाना बनली ५ हजारी मनसबदार; मिताली, हरमनप्रीतच्या खास क्लबमध्ये एंट्री