इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा पहिला सामना २६ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला रोहित शर्मा या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईचे सर्वच खेळाडू आयपीएलची तयारी करत आहेत, त्यांचे सरावादरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तसेच कर्णधार रोहितने आयपीएल २०२२ साठी फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे.
रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर फोटोशूटदरम्यानचा मुलीसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. रोहितने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ‘कॅम्पेनचा असा भाग जो तूम्ही पाहू शकत नाही.’ व्हिडीओमध्ये रोहित फोटोशूट करताना दिसत आहे. तसेच सोबत मुलगी समायरासोबत मस्ती आणि डान्स करताना देखील दिसत आहे. तसेच तो कॅमेरामॅनसोबत सुद्धा मस्ती करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CbZOikPDpW_/?utm_source=ig_embed&ig_rid=c560e237-5425-46ba-9a0e-189558d3be39
या व्हिडीओशिवाय मुंबई संघाच्या ट्वीटर आकाऊंटवर रोहितचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित आयपीएल ट्राॅफींसह उभा आहे. मुंबई संघाने २०१३, २०१५, २०१७ , २०१९ आणि २०२० या पाच वर्षांचे आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. सोशल मिडीयावर रोहितच्या आयपीएल ट्राॅफीसोबतच्या फोटोची मागणी केली जात होती. मुंबईने चाहत्यांची मागणी मान्य करत फोटो शेअर केला आहे.
𝐇𝐞𝐫𝐞. 𝐖𝐞. 𝐑𝐎. 🔥#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/OMbp5rUAt3
— Mumbai Indians (@mipaltan) March 22, 2022
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २७ मार्चला दिल्ली संघासोबत सीसीआय मैदानात खेळला जाणार आहे. तर दूसरा सामना राजस्थान राॅयल्स संघासोबत २ एप्रिलला खेळला जाणार आहे. संघाने आयपीएल सामन्यांसाठी नवी जर्सी सुद्धा लाॅन्च केली आहे. मुंबईने आयपीएल लिलावापुर्वी रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंना संघात कायम ठेवले होते. लिलावात संघाने इशान किशनवर सर्वाधिक बोली लावत विकत घेतले. किशनला संघाने १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ ३० धावा करूनही मंधाना बनली ५ हजारी मनसबदार; मिताली, हरमनप्रीतच्या खास क्लबमध्ये एंट्री
लखनऊच्या अडचणीत वाढ, मार्क वुडच्या रिप्लेसमेंटला बोर्डाने नाकारली आयपीएल खेळण्याची परवानगी
ऑस्ट्रेलियाने जिंकली टॉपची लढत, अजेय दक्षिण आफ्रिकेला नमवत लगावला विजयाचा ‘सिक्सर’