इंग्लंडच्या टी२० संघाचा विद्यमान कर्णधार जोस बटलर सध्या जबरदस्त लयीत आहे. आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा कुटत ऑरेंज कॅपचा मानकरी बनल्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध वनडे मालिकेत त्याने विस्फोटक फलंदाजी केली होती. मात्र भारताविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात त्याची बॅट तळपू शकली नाही आणि त्यासाठी कारणीभूत ठरला भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वरने धारधार चेंडू टाकत बटलरला शून्यावर बाद केले. या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भुवनेश्वरने विणले जाळे
इंग्लंडकडून जेसन रॉय प्रथम फलंदाजीसाठी आला होता. भुवनेश्वरने (Bhuvneshwar Kumar) त्याला आऊट स्विंगर (Out Swing) चेंडू फेकला. जेसनने बाहेर जात असलेल्या सलग ३ चेंडूंवर एकही धाव बनवली नाही. त्यानंतरही भुनेश्वरने चौथा चेंडू आऊट स्विंगच टाकला. या चेंडूवर जेसनने लेग साइडला फटका मारला आणि १ धाव घेतली. बटलर दुसऱ्या बाजूला उभा राहून भुवनेश्वरचे पहिले चारही बारकाईने पाहात होता. पाचव्या चेंडूवेळी तो स्वत स्ट्राईकवर आला. बटलरला आता षटकातील पाचव्या आणि आपल्या पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा आऊट स्विंगर येण्याची अपेक्षा होती. परंतु इथेच भुवनेश्वरने आपले बुद्धिचातुर्य दाखवले.
इनस्विंगवर बटलरला केले त्रिफळाचीत
भुवनेश्वरने बटलरला (Jos Buttler) इनस्विंग (In Swing) चेंडू फेकला. या चेंडूवर बटलरचा गोंधळ उडाला आणि चेंडू त्याच्या पॅडवर लागून मागे यष्ट्यांवर धडकला. अशाप्रकारे पुन्हा एकदा बटलर भुवनेश्वरचा गिऱ्हाईक ठरला. तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद झाला. भुवनेश्वरने पावरप्लेमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने पावरप्लेमध्ये फक्त १० धावा खर्च केल्या आणि बटलरची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
BOWLED!
Bhuvneshwar Kumar gets the big wicket, Jos Buttler gone for duck 🙌 #ENGvIND pic.twitter.com/NClQLHXFgp
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 7, 2022
बटलरसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरलाय भुवनेश्वर
टी२० क्रिकेटमध्ये बटलर विरुद्ध भुवनेश्वर या लढतीत अधिकतर वेळी भुवनेश्वरचा विजय झाल्याचे दिसते. भुवनेश्वरने आतापर्यंत बटलरला टी२० क्रिकेटमध्ये ३० चेंडू फेकताना ४ वेळा बाद केले आहे. तर बटलर यादरम्यान फक्त २८ धावा काढू शकला आहे. अशाप्रकारे पुन्हा एकदा बटलरला आपल्या जाळ्यात फसवणारा भुवनेश्वर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बॅट अन् बॉल दोन्हीने चमकला, हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू प्रदर्शनासह विश्वविक्रम केला
‘कर्णधार’ रोहितचा विषयच खोल! इंग्लंडविरुद्धची पहिली टी२० जिंकत विश्वविक्रम नावावर
‘विराट कोहली सचिन आणि ब्रॅडमनपेक्षाही महान खेळाडू’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचा दावा