Samit Dravid :- कर्नाटकची टी20 लीग महाराजा ट्रॉफी सुरू झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात बेंगळुरू ब्लास्टर्सने गुलबर्गा मिस्टिक्सचा पराभव केला. लीगचा दुसरा सामना शिवमोगा लायन्स आणि म्हैसूर वॉरियर्स यांच्यात झाला. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. मात्र, तो पहिला सामन्यात प्रभावित करण्यात अपयशी ठरला.
मधल्या फळीतील फलंदाज समित द्रविड प्रथमच महाराजा ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होत आहे. 18 वर्षीय समितला त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. केवळ 9 चेंडूंच्या खेळीत त्याला 7 धावा करता आल्या. त्यात एका चौकाराचा समावेश होता. हार्दिक राजच्या चेंडूवर आनंद दोडामणीने द्रविडचा झेल घेतला. भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा करुण नायर म्हैसूर संघाचे नेतृत्व करत आहे.
समितने डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाविरुद्ध मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटला नीट न लागल्याने डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला.
— hiri_azam (@HiriAzam) August 15, 2024
समित द्रविडची अपेक्षित फलंदाजी झाली नसली तरी त्याच्या संघाने हंगामातील पहिला सामना जिंकला. प्रथम खेळताना वॉरियर्सने 8 विकेट्सवर 159 धावा केल्या. नवव्या क्रमांकावर आलेल्या मनोज भांडगेने अवघ्या 16 चेंडूत 42 धावा केल्या. यात चार षटकारांचाही समावेश होता. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात लायन्स संघाला 9 षटकात 5 बाद 80 धावाच करता आल्या. अभिनव मनोहरने 29 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतरही वीजेडी पद्धतीने निकाल लागलेल्या सामन्यात लायन्सला 7 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे नेहमीसाठी बंद? माजी क्रिकेटर म्हणाला, “गंभीर असतानाही…”
SA20: कार्तिक, राशिद खान, कॉनवेसारखे स्टार खेळाडू सहभागी! कधी होणार स्पर्धा?
विनेशमुळे भारताचे नुकसान, कुस्तीमध्ये 4 पदके गमावली? WFI अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ