मुंबई । ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहतो. नुकतेच त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याविषयी आपली मते व्यक्त करत आहे.
या व्हिडिओमध्ये तो सौरव गांगुलीचे कौतुक करत आहेत तर प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याविषयी तो वादग्रस्त विधान करतोय. सौरव गांगुलीच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त निमित्त हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सौरव गांगुली शोएब अख्तरच्या गोलंदाजीचा सामना करताना भीत होता असे बोलले जाते. यावर तो बोलताना म्हणाला की, “सौरव गांगुलीच्या बाबतींत असे बोलणे चुकीचे आहे. तो भारताचा ‘शेरदिल’ कर्णधार होता.”
तो म्हणाला, “सौरव गांगुलीने भारतीय संघाला तयार केले आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तानचा संघ भारताला हरवून थकून गेला होता. त्यानंतर गांगुलीला कर्णधार बनवले. आणि भारतीय संघ आक्रमक दिसू लागला.”
“लोक म्हणतात की, गांगुली हा डिफेन्सिव्ह कॅप्टन होता. जे लोक असा विचार करतात त्यांचे डोके बरोबर नसतील. गांगुलीने संपूर्ण संघ बनवून दिला. त्यानंतर मालिका जिंकण्यास सुरुवात झाली. बीसीसीआयने ग्रेग चॅपल यांच्या सांगण्यावरून गांगुलीला संघाबाहेर काढण्यात आले. ज्याने देशाचे इतकी सेवा केली होती. जो प्रशिक्षक आपल्या पत्नीला देखील खुश ठेऊ शकला नाही, तो भारतीय संघाला काय खूश ठेवणार होता,” असे शोएब अख्तर म्हणाला.
तो म्हणाला, “लोक गांगुली विषयी म्हणत होते की, तो माझी गोलंदाजी खेळण्यात भीत होता. वास्तविक पाहता, तो पुल शॉट खेळू शकत नव्हता. पण तो भीत नव्हता. गांगुली हा मोठा कर्णधार होता. त्याने भारतीय संघाला एमएस धोनीसारखा खेळाडू मिळवून दिला.”