कॅरेबियन प्रीमियर लीगचा पाचवा हंगाम नुकताच सुरु झाला असून यात रोज नवनवीन गोष्टीमुळे ह्या लीगची जोरदार चर्चा आहे. ४ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेत ६ संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात त्रिबंगॉ नाइट रायडर्स विरुद्ध सेंट लुसिया हे संघ आमने सामने होते. त्यावेळी ७व्या षटकात डावखुरा गोलंदाज खरी पिअर्स याने एक सरळ चेंडू टाकला. समोर वेस्ट इंडिजचा आंद्रे फ्लेचेर त्याचा सामना करत होता. जेव्हा त्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तो त्याकडून मिस होऊन स्टंपला स्पर्श करून सीमारेषा पार गेला.
जेव्हा हा चेंडू पुन्हा रिप्लेमध्ये पाहण्यात आला तेव्हा तो लेग स्टंपला स्पर्श करून गेला होता. स्टंपवरील बेल्सच्या एलईडी लाइट सुरु झाल्या होत्या, मात्र बेल्स खाली पडल्या नाहीत. त्यामुळे आंद्रे फ्लेचेर नाबाद राहिला. शिवाय संघाला बाईजच्या ४ धावाही मिळाल्या.
पहा संपूर्ण व्हिडिओ
Chewing gum on the stumps pic.twitter.com/Hhe4I8Lv7u
— CPL T20 (@CPL) August 8, 2017