---Advertisement---

हाथ आया पर मुंह न लगा! पहिलीच वनडे मालिका गमावल्यानंतर कर्णधार राहुलने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: सोमवार, जानेवारी 24, 2022 2:45 PM
Kl Rahul
---Advertisement---

रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद केएल राहुल (KL Rahul)कडे सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असुन केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपचा सामना केला आहे. या एकदिवसीय मालिकेपुर्वी भारताला कसोटी मालिका सुद्धा गमवावी लागली होती.

भारतीय संघ केपटाउन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाच्या जवळ पोहचला होता, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. भारताला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह मालिकेत यजमानांनी भारताचा ३-० असा पराभव केला आहे. तीन किंवा अधिक सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला क्लीन स्वीप करण्याची ही पाचवी वेळ होती. यानंतर कर्णधार राहुलने पराभवाचे खापर फलंदाजावर (Captain Rahul On India Defeat) फोडले आहे.

व्हिडिओ पाहा-आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

केएल राहुल म्हणाला की, “दीपकने आम्हाला चांगली संधी दिली होती, ज्यामुळे आम्ही सामना जिंकू शकत होतो. पण तसे झाले नाही. आम्ही यातून शिकू. आम्ही अनेक चुका केल्या, आमचे शाॅट सिलेक्शन चुकीचे होते, जे सर्वांनी पाहीले. आम्ही चांगली कामगीरी केली पण ती जास्त वेळ आम्ही टिकवू शकलो नाही. त्यामुळे आमचा निकाल असा लागला.” 

“राहिला कसोटी कर्णधारपदाचा प्रश्न तर मी बऱ्याच काळापासून संघाचा भाग आहे. सामना कसा समजून घ्यायचा आणि पुढे जायचे मला माहित आहे. येणारा काळ विश्वचषकाचा असणार आहे. आता आशा आहे की मर्यादित षटकांच्या मालिकेत आम्ही चांगली कामगीरी करु. दक्षिण आफ्रिकेत वेळ घालवणे चांगले होते. मी तेथे खूप काही शिकलो आणि भविष्यात त्याचा उपयोग होईल,” असेही त्याने म्हटले.

रविवारी (२३ जानेवारी) झालेल्या केपटाउन येथील सामन्यात भारताला आपली लाज वाचवण्याची शेवटची संधी होती. पण भारताने कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिका गमावल्या आहेत. कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाज क्विंटन डिकॉकच्या शतकानंतरही दक्षिण आफ्रिका संघाला २८७ धावांत रोखण्यात यशस्वी झाले. अखेर ३९ षटकात भारताने ६ गडी गमावून २१० धावसंख्या उभी केली होती. पण दीपक चहरने शेवटच्या षटकात ३४ चेंडूत ५४ धावांची खेळी करूनही भारतीय संघाला विजयासाठी २८८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. भारतीय संघ ४९.२ षटकात २८३ धावा करू शकला.

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेत भारताने केली निराशा, तरीही प्रशिक्षक द्रविडने घेतली राहुलसेनेची बाजू; म्हणाले…

पराभव, पराभव, पराभव! ‘कर्णधार’ राहुलचा पुढचा मार्ग खडतर, पहिल्याच मालिकेत लाजिरवाणा विक्रम नावे

Photo: पहिल्याच संधीत चँपियनसारखा खेळला, पण शेवटी नको तेच झाल्याने चाहरला कोसळलं रडू

हेही पाहा-

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---