आयपीएलच्या एकूण १५ हंगामात पंजाब किंग्स संघ केवळ दोन वेळा प्ले-ऑफमध्ये पोहचण्यास यशस्वी ठरला आहे. शिवाय एकदाही पंजाबला आसपीएलचे जेतेपद मिळवता आले नाही. यंदाच्या म्हणजेच २०२२ च्या हंगामात देखील पंजाब प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यास अपयशी ठरला आहे. आयपीएल २०२२ मधील अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबने हैदराबादला ५ विकेट्सने मात दिली. त्यानंतर पंजाबचा कर्णधार मयांक अगरवाल (Mayank Agarwal) याने संघाबाबत मोठं वक्तव्य करत संघाच्या अपयशाबद्दल कबुली दिली.
मयांक म्हणाला की, “यंदाच्या हंगामात आम्ही सातत्याने सामने जिंकण्यास अपयशी ठरलो. त्यामुळे आम्हाला यंदाच्या वर्षी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. मात्र, शिखर धवन (Shikhar Dhawan), लियाम लिंव्हिंगस्टोन (Liam Livingstone) , जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow), अर्शदिप सिंग (Arshdeep Singh) सारख्या खेळाडूंनी यंदाच्या हंगामात प्रभावित केले आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या हंगामात नव्या जोशात चांगले पुनरागमन करू.”
दरम्यान, पंजाब विरुद्ध हैदराबाद या सामन्यात पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) याला सामनावीर देऊन गौरवण्यात आलं. हरप्रीतने या सामन्यात ४ षटकांत २६ धावा देत तीन विकेट्स पटकावल्या. त्यानंतर बोलताना हरप्रीतने अखेरच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे असल्याचे सांगत पंजाबच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. शिवाय अर्शदिप सिंगचा आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात समावेश झाल्याने त्याला शुभेच्छा दिल्या.
रविवारी (२२ मे) पंजाब आणि हैदराबाद यांच्यात झालेला सामना हा आयपीएल २०२२ मधील अखेरचा साखळी सामना होता. या सामन्यात पंजाबने ५ विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादने २० षटकात ८ बाद १५७ धावा करत पंजाबला १५८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पंजाबने १५.१ षटकात ५ विकेट्स मोबदल्यात पूर्ण केले. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा
Video: थोडक्यात बचावला राजस्थान संघ! कोलकाताला जाताना विमान प्रवासादरम्यान टळले मोठे संकट
फॉर्मात असलेल्या पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन; प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘माझी निवड झाल्याचा..’