तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी २० सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या ऑफकटरवर विश्वास असल्याचे सांगितले आहे.
काल पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी २० सामन्यात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १९ धावांची गरज असताना अष्टपैलू हार्दिक पंड्याने हे षटक टाकले. भारताने हा सामना ६ धावांनी जिंकून मालिकाही जिंकली.
या विषयी विराटला प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितले, ” आमचा हार्दिकवर विश्वास आहे आणि त्याचे ऑफकटर बॉल चांगले असतात. काल खेळपट्टी थोडी ओलसर होती. त्यामुळे बॉल थांबून येत होता. मी हार्दिककडे जाण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या षटकातील तीन बॉल झाल्यानंतर तो मला म्हणाला ‘मी हे करेल तू काळजी करू नकोस’. “
“एक कर्णधार म्हणून तुम्हाला जेव्हा तुमच्या गोलंदाजाकडून असा विश्वास मिळतो तेव्हा तुमच्याकडे जास्त काही बोलण्यासाठी नसते. त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे आणि त्याने सामना चांगला संपवला.”
याबरोबरच विराटने बाकीच्या गोलंदाजांचेही कौतुक केले.