तब्बल सतरा वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत असलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या कसोटीवर कब्जा केला. रावळपिंडी येथे झालेल्या या कसोटीत अखेरच्या दिवशी इंग्लंडने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत यजमान पाकिस्तानला 74 धावांनी नमवले. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
आपला दुसरा डाव घोषित करून पाकिस्तानला विजयासाठी आव्हान दिल्यानंतर बेन स्टोक्स याचे अनेक जण कौतुक करत होते. इंग्लंडचा हा निर्णय अखेरच्या दिवशी योग्य ठरला व त्यांनी विजय संपादन केला. त्यानंतर, आपली प्रतिक्रिया देताना बेन स्टोक्स म्हणाला,
“आम्ही याच आक्रमक अंदाजात कसोटी क्रिकेट खेळत आहोत. सामना अनिर्णित ठेवणे, याचा आम्ही विचारच करत नाही. कसोटी अनिर्णित ठेवणे यावर ड्रेसिंग रूममध्ये चर्चा देखील घडत नाही. आम्हाला केवळ विजय हवा असतो. हा नक्कीच एक संस्मरणीय विजय आहे.”
बेन स्टोक्स कर्णधार व ब्रेंडन मॅकलम प्रशिक्षक झाल्यापासून इंग्लंडने आठ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला असून, एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
रावळपिंडी येथील फलंदाजांना पूरक असलेल्या खेळपट्टीवर सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानचा पहिला डाव 579 धावांत गुंडाळला होता. तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात चार फलंदाजांच्या शतकांच्या जोरावर 657 धावा उभारलेल्या. आपल्या दुसऱ्या डावात अतिशय आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडने 264 धावा उभारल्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर विजयासाठी 343 धावांचे आव्हान ठेवले गेले. अनुभवी जेम्स अँडरसन व युवा ओली रॉबीन्सन यांच्यापुढे पाकिस्तानी फलंदाजीची वाताहात झाली. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 268 धावांवर संपुष्टात आला. यासह पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव झाला.
(We Not Interesting In Draw Test Ben Stokes After Rawalpindi Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपल्याच खेळाडूला कोट्यावधी कमावण्यापासून रोखत आहेत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा संपूर्ण प्रकरण
ऑस्ट्रेलियन संघात ‘या’ दोन फास्ट बॉलर्सची एंट्री, दोघेही करतात वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी