भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला जोरदार प्रारंभ झाला आहे. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (१९ जून) देखील कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. साउथम्प्टनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक आहे. त्यात पावसामुळे ढग दाटून आल्याने वेगवान गोलंदाजांना आणखी फायदा मिळतो. त्यामुळे फलंदाजांची कसोटी लागते. अशात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी संघाच्या धावसंख्येबद्दल भाष्य केले आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६२ धावा जोडल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मा ३४ धावा करत माघारी परतला. तर शुबमन गिलने २८ धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली हे दोघेही मैदानावर टीचून फलंदाजी करत आहेत. विराट नाबाद ४४ धावांवर फलंदाजी करत आहे. तर रहाणे नाबाद २९ धावांवर फलंदाजी करत आहे.
अशातच कमी प्रकाशाचा व्ययत्य आल्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. खेळ समाप्तीनंतर, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटले की, “आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. परंतु अशा परिस्थितीत २५० पेक्षा अधिक धावा करणे उत्तम असेल.” (We will score as many runs as possible but 250 runs will be reasonable score on this pitch says batting coach Vikram rathour)
गिलचे केले कौतुक
विक्रम राठोड यांनी सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “रोहित आणि गिल यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली. दोघांनी हे दाखवून दिले की, दोघेही मोठी खेळी करू शकतात. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीला माझा सलाम. परंतु अधिक श्रेय सलामी जोडीला देखील दिले पाहिजे.”
पुजारा बद्दल बोलताना विक्रम राठोड म्हणाले
चेतेश्वर पुजारा या डावात ८ धावा करत माघारी परतला होता. याबाबत बोलताना विक्रम राठोड म्हणाले, “पुजारा एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि आम्हाला याबाबत काहीच चिंता नाही. मला नाही वाटत की, गतीमुळे त्याला त्रास होत असेल. जोपर्यंत तो फलंदाजी करत होता, तेव्हापर्यंत तो चांगला खेळताना दिसून येत होता. आज (१९ जून) त्याने ५० पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. त्याला चांगली सुरुवात मिळत आहे. परंतु ती पुढे घेऊन जाता येत नाहीये. मला आशा आहे की, हे लवकरच होईल.” दुसऱ्या दिवसाच्या अखेर भारतीय संघाच्या धावा ६४.४ षटकात ३ बाद १४६ होत्या.
महत्वाच्या बातम्या
साउथम्पटन कसोटीवर पुन्हा काळे ढग आणि अंधुक प्रकाशाचे संकट, तिसऱ्या दिवसाचा खेळ बिघडणार!
पव्हेलियनमध्ये बसून दुर्बिनने रोहित पाहात होता विराटची खेळी; नेटकरी म्हणाले, ‘हीच खरी मैत्री’
‘पाऊस आमचा जल्लोष काय थांबवणार’, म्हणत चाहत्यांनी गायले हिटमॅन सॉन्ग; एकदा ऐकाच