टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) ऍडलेड येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाणार आहे. हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेदरम्यान अनेक सामन्यात पावसाने रोडा घातला होता, त्यामुळे काही सामने अनिर्णित राहिले. अशात चाहत्यांच्या मनात भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यापूर्वी ऍडलेडमधील वातावरणाबद्दल असा प्रश्न असेल की, या सामन्यातही पाऊस रोडा घालेल का? तसेच, जर पावसामुळे सामना झाला नाही, तर काय होईल? चला या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया…
पावसामुळे सामना झाला नाही, तर काय होईल?
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघातील सामना जर पावसामुळे झाला नाही, तर सुपर 12 गटात अव्वलस्थानी राहणाऱ्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. याचा अर्थ असा की, जर पावसामुळे झाला नाही, तर भारत अंतिम सामन्यात स्थान मिळवेल. कारण, भारतीय संघाने दुसऱ्या गटात अव्वलस्थानी राहून उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. खरं तर, उपांत्य फेरी सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवसही ठेवला आहे. या दिवसाचा वापर तेव्हाच होईल, जेव्हा ठरलेल्या दिवशी प्रत्येकी 5 षटकांचा सामना होणार नाही.
कसे आहे ऍडलेडचे हवामान?
एका रिपोर्टनुसार, 10 नोव्हेंबर रोजी ऍडलेडमध्ये दिवसा पावसाची शक्यता 25 टक्के सांगितली जात आहे. वातावरण एकदम थंड असेल आणि ढगाळ वातावरण असेल. रिपोर्टनुसार, 71 टक्के शक्यता आहे की, पूर्ण दिवस डगाळ वातावरण राहील. दुसरीकडे, हवा ताशी 35 किमी वेगाने असेल. हे हवामान पाहून असे वाटते की, या सामन्यात गोलंदाजांना मदत मिळेल.
असे असतील दोन्ही संघ
इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेविड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ऍलेक्स हेल्स.
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीचे सुटले नियंत्रण, केले ‘असे’ काही कृत्य
‘आम्ही मेलबर्नमध्ये तुमची वाट बघतोय’; टीम इंडियाला पाकिस्तानी दिग्गजाचे ओपन चॅलेंज