वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आणि आयपीएल मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा निकोलस पूरन याने नुकतीच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. निकोलस पूरनने आपली वाग्दत्त वधू कॅथरिन मिगुल हिच्याशी विवाह केला. आपल्या या विवाहाची बातमी त्याने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. ही बातमी कळताच संघ सहकार्यांनी आणि इतर क्रिकेटपटूंनी नवविवाहित दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
निकोलस पूरनने ट्विट करत ही माहिती दिली. या ट्विट मध्ये तो म्हणाला, “आयुष्यात मला देवाने अनेक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. पण माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा मोठे काहीच नाही. मिस्टर आणि मिसेस पूरनचे स्वागत करा.” यासह त्याने लग्नाचे फोटो देखील शेअर केले आहेत. कॅथरिनने देखील आपल्या अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले. निकोलस पूरनचे ट्विट पाहून अनेक खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या. यात ख्रिस गेल, केएल राहुल, मयंक अगरवाल, डेव्हिड वॉर्नर, जीमी नीशम, किरोन पोलार्ड अशा अनेक खेळाडूंचा समावेश होता.
Jesus has blessed me with many things in this life. None greater than having you in my life.
Welcoming Mr. and Mrs. Pooran ❤️ pic.twitter.com/dDzSX8zdSA— NickyP (@nicholas_47) June 1, 2021
आयपीएल स्थगितीनंतर पूरन परतला मायदेशी
एप्रिल-मे महिन्यात भारतात आयोजित केल्या गेलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात निकोलस पूरनने सहभाग घेतला होता. मात्र हा हंगाम मध्यात आला असतांना काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बीसीसीआयने हा हंगाम तात्पुरता स्थगित केला होता. त्यानंतर सगळेच परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले होते. यात पूरनचा देखील समावेश होता. त्याचवेळी निकोलस पूरनने सामाजिक जाणीव ठेवत कोरोनाच्या दुसर्या लाटेत संघर्ष करणार्या भारताला मदत म्हणून आपल्या आयपीएल मानधनातील हिस्सा दान करण्याची घोषणा देखील केली होती.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केला होता साखरपुडा
निकोलस पूरनने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा केला होता. त्याने आणि कॅथरिन मिगुलने तेव्हाही सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली होती. त्यानंतर आयपीएलच्या सामन्यां दरम्यान कॅथरिन पंजाब किंग्जच्या संघाला प्रोत्साहन देतांना देखील दिसून आली होती. आता साखरपुड्याच्या सहा महिन्यांनंतर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले, शुबमन गिलचा ‘तो’ शॉट त्याच्या फलंदाजीतील मोठी कमजोरी
ENGvsNZ: कसोटी मालिका तोंडावर असताना इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार सराव सत्रात दुखापतग्रस्त