विंडीज संघाचा फिरकीपटू सुनील नारायणसमोर पुन्हा एकदा अवैध गोलंदाजीचे संकट उभे राहिले आहे. सध्या दुबईमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये त्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे.
पीएसएलमध्ये नारायण लाहोर कलंदर्स संघाकडून खेळतो. त्याला याबद्दल इशारा देण्यात आला असला तरी तो पुढील स्पर्धेत खेळू शकतो. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की “शारजा येथे झालेल्या पीएसएलमधील लाहोर कलंदर्स विरुद्ध क्वाटा ग्लॅडिएटर्स यांच्या सामन्यादरम्यान नारायणाची गोलंदाजी अवैध असल्याचा संशय आला.”
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, “सामना अधिकाऱ्यांनी केलेल्या नारायणाच्या गोलंदाजी शैलीचा अहवाल विंडीज क्रिकेट मंडळाकडे पाठवला जाणार आहे. त्याला या अवैध गोलंदाजी प्रकरणी विंडीज क्रिकेट मंडळाच्या प्रक्रियेतून जावे लागेल.”
नारायणवर याआधीही दोन वेळा अवैध गोलंदाजीचा आरोप झाला होता. पण त्याने त्यानंतर त्याच्या गोलंदाजी शैलीत बदल करून पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.
त्याच्यावर भारतात झालेल्या चॅम्पियन लीग २०१४ मध्ये आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान नोव्हेंबर २०१५ मध्ये अवैध गोलंदाजीचा आरोप झाला होता. यानंतर नारायणने आयपीएल २०१६ मध्ये पुनरागमन केले होते.
📰 Sunil Narine has been reported for a suspected illegal bowling action during match between Lahore Qalandars & Quetta Gladiators at Sharjah.
Narine has now been placed on the warning list and may continue to be selected to play and bowl for his team in the #HBLPSL. pic.twitter.com/DndD6hZphW— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 15, 2018