भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीलाच शिखर धवनच्या नेतृत्वातील संघाने वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर आता प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीत दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत एकमेकांशी दोन हात करतील. भारतीय संघातील बऱ्याच अनुभवी खेळाडूंनी या मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे. त्याबरोबरच वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली.
आयपीएल गाजवणारे खेळाडू यजमान संघात
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांसाठी आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा निकोलस पूरन करेल. या दोन्ही मालिकांसाठी वेस्ट इंडीज संघात बऱ्याच खेळाडूंनी पुनरामन केले आहे. यामध्ये मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर, ओडेन स्मिथ व ओबेद मेकॉय यांचा समावेश आहे. हेटमायर हा दुखापतीच्या कारणाने मागील दोन महिन्यांपासून संघाचा भाग नव्हता. अनुभवी वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल व अष्टपैलू फॅबियन ऍलन हे मात्र दुखापतीतून सावरू न शकल्याने संघाचा भाग नाहीत. त्याचवेळी वेस्ट इंडीज संघाला यावर्षी भारत दौऱ्यावर टी२० मालिकेतही सपाटून मार खावा लागलेला.
🚨 Breaking News🚨 Today CWI named 16 players for the upcoming Goldmedal T20I Cup, powered by Kent Water Purifiers against India.
Squad Details⬇️ https://t.co/MZiH0SakKE
— Windies Cricket (@windiescricket) July 28, 2022
भारत व न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ-
निकोलस पूरन (कर्णधार), शामराह ब्रूक्स, ब्रेंडन किंग, कायले मायर्स, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), डोमेनिक ड्रेक्स, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, जेसन होल्डर, ओबेद मेकॉय, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, शिमरन हेटमायर, किमो पॉल, हेडन वॉल्श, डेवॉन थॉमस.
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला सामना- २९ जुलै (पोर्ट ऑफ स्पेन)
दुसरा सामना- ०१ ऑगस्ट (सेंट किट्स)
तिसरा सामना- ०२ ऑगस्ट (सेंट किट्स)
चौथा सामना- ०६ ऑगस्ट (फ्लोरिडा)
पाचवा सामना- ०७ ऑगस्ट (फ्लोरिडा)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तुला माही म्हणू की माही भाई? जेव्हा उथप्पाने धोनीलाच विचारला होता प्रश्न; मिळाले होते असे उत्तर
“रोहित आणि द्रविडने स्वत: जाऊन खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराटशी बोलायला पाहिजे”
जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…